Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजकुरूड येथील आशास्वयंसेविका पद भरती रद्द करुन पारदर्शी प्रक्रिया राबवा- देसाईगंज वंचित...

कुरूड येथील आशास्वयंसेविका पद भरती रद्द करुन पारदर्शी प्रक्रिया राबवा- देसाईगंज वंचित बहुजन आघाडी – २० हजार रुपये न दिल्याने भरती प्रक्रियेतुन बाद करण्याचा आरोप..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कुरुड प्राथमिक आरोग्य केन्द्राअंतर्गत निवड करण्यात आलेल्या आशास्वयंसेविका पदभरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असुन निवड समितीने नियम धाब्यावर बसवुन पात्र विधवा महिलेला डावलले.याविषयी योग्य चौकशी करावी व भरती प्रक्रिया रद्द करुन पारदर्शी पद्धतीने निवड प्रक्रिया राबवावी,अश्या मागणीचे निवेदन आज,शुक्रवार २९ ऑगस्ट रोजी देसाईगंज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह राज्याचे आरोग्य मंत्री,गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तहसिलदार देसाईगंज यांना सादर करण्यात आले.
कुरुड येथील रहिवासी असलेल्या कल्याणी महेश वासनिक या विधवा महिलेसह ६३ महिलांनी आशावर्करच्या २ पदांसाठी तालुका वैद्यकिय अधिकारी देसाईगंज यांचेकडे अर्ज सादर केले होते.उच्चशिक्षित असलेल्या कल्याणी वासनिक यांना निवड समितीचे सचिव डॉ.पत्रुजी सडमाके यांनी २० हजार रुपयांची मागणी केली.मात्र,पैसे न दिल्याने सदर महिलेला मौखिक परिक्षेत कमी गुण देऊन भरती प्रक्रियेतुन बाद करण्यात आले.हा सुशिक्षित विधवा महिलेवर अन्याय असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सदर भरती प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी दुसऱ्यांदा निवड प्रक्रिया राबवुन व्हिडीओ कॉन्फरन्स रेकॉर्डींग करण्यात यावे,अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातुन करण्यात आली आहे.देसाईगंजच्या तहसिलदार प्रिती डुडुलकर यांना निवेदन सादर करतांना कल्याणी वासनिक यांचेसह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम,जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भीमराव शेन्डे,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रद्न्या निमगडे,देसाईगंज तालुकाध्यक्ष विनोद मेश्राम,शहराध्यक्ष प्रा.अशोक मेश्राम,दिलिप बन्सोड,अभियंता प्रमोद मेश्राम,कुंदा झाडे,भारती मेश्राम, कुमता मेश्राम,ज्योती दहिकर, रविना मेश्राम,प्राजक्ता मेश्राम,अक्षता ठवरे,प्रिया घोडेस्वार,विजय मेश्राम,प्रियंका बोरकर,मनिषा गणवीर यांचेसह कुरुडचे ग्रामस्थ उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!