Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंज रेती तस्करांनी पोखरून काढले रेतीघाट…-अनेकांचे खिसे होतात गरम अन् अधिकारी,कर्मचारी पडतात नरम…

 रेती तस्करांनी पोखरून काढले रेतीघाट…-अनेकांचे खिसे होतात गरम अन् अधिकारी,कर्मचारी पडतात नरम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यात अनेक रेती तस्कर निर्माण झाले आहेत.अशातच प्रशासनाच्या आशीर्वादाने नद्याचे पात्र पोखरून टाकण्यात येत आहे.त्यामुळे लाखोंचा महसूल चोरीला जात आहे.देसाईगंज तालुक्यातील अनेक रेतीघाट तस्करांनी पोखरून काढले आहेत. रात्रभर यंत्र तसेच चोरटे मजुरांच्या साहाय्याने रेती काढणे सुरू असतांना अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.दिवसागणिक तस्करांच्या टोळ्या वाढतच आहेत.मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या रेतीचे उत्खनन सुरू आहे.अधिकारी व कर्माचाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती तस्करी सुरू असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.देसाईगंज तालुक्यातील काही भागात उत्तम दर्जाची रेती साठा आहे.नद्यांमधून मोठ्या प्रमाणात रेती तस्करी करून देसाईगंज तसेच इतरत्र रेतीची वाहतूक होतांना दिसत आहे.रेती तस्कर खुलेआम रेतीची वाहतूक करतात.घाटाशेजारी हजारो ब्रास रेती साठा रात्रभरात जमा होतो आणि अचानक गायब होतो.पुन्हा आठवडा भरात रेतीचे ढिगारे जसेच्या तसे दिसून येतात.अनेक माणसे घाटापासून ते तालुक्यापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नजर ठेऊन असतात.रेती घाटाकडे सामान्य नागरिक शेताकडे जातांना आढळल्यास त्यांना घेराव घालून चौकशी करतात व त्यांना दम देण्याचा प्रकार हल्ली निदर्शनास येऊ लागला आहे.स्थानिक तसेच तालुक्यातील अधिकारी कर्माचाऱ्यांना जाग येणार की नाही? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!