Sunday, September 13, 2026
Homeदेसाईगंजराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी रजनीकांत गुरनुले...

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी रजनीकांत गुरनुले…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या सावंगी येथील ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत गुरनुले यांची राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील घोट येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यकारणीची बैठक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.या बैठकीत देसाईगंज तालुक्यातील सावंगी ग्रामपंचायतीचे सदस्य रजनीकांत गुरनुले यांचे कार्य बघता संघटनेच्या देसाईगंज तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब, तळागाळातील शोषित वंचितांना न्याय देण्यासाठी रजनीकांत गुरनुले यांची नियुक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांनी केली आहे.नियुक्ती करतेवेळी संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विश्वास,प्रदेश उपाध्यक्ष भारत खटी,विदर्भ अध्यक्ष जावेद सय्यद,विदर्भ कार्याध्यक्ष नेताजी सोंदकर,गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू खुणे,जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी,जिल्हा संघटिका अनिता रॉय,जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना डहारे,चामोर्शी तालुकाध्यक्ष कालिदास बनसोड,राहुल झोडे,कृष्णा वाघाडे,नानू उपाध्ये,महिला आघाडी तालुकाध्यक्षा विशाखा शील,शरीफ शेख, किशोर देवतळे,दिनेश मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.प्रसंगी संघटनेचे मान्यवर तथा पदाधिकाऱ्यांनी रजनीकांत गुरनुले यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे व धोरणात्मक बदल जारी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वाळू आणि वाळू घाटांच्या लिलाव प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी तसेच अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक...

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ या लोकनाट्यास सातारा येथील पुरस्कार जाहीर.. -यंदाचा सहावा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट,डाकेवाडी(जि. सातारा)या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना स्पंदनच्या वार्षिक साहित्य संमेलनात उत्कृष्ट...

शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक शिक्षा पॉक्सो कायद्यांतर्गत लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही-सर्वोच्च न्यायालय -शिक्षकावरील संपूर्ण खटला रद्द..

उद्रेक न्युज वृत्त :-शाळेत शिक्षकाने दोन विद्यार्थिनींना दिलेल्या शिक्षेवरून शिक्षकाविरोधात नोंदवण्यात आलेला गुन्हेगारी खटला सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे रद्द करून शाळेत विद्यार्थ्यांना दिली जाणारी शारीरिक...

आपसी समझोत्याने ४६१ प्रकरणे निकाली; तब्बल ४ कोटी १६ लाखांहून अधिकच्या रकमेवर तडजोड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्हा न्यायालय तसेच जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!