Monday, May 25, 2026
Homeमुंबईराशन दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेत वाढ..!

राशन दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेत वाढ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-गेले अनेक दिवसांपासून रास्त भाव दुकानदारांची मार्जिन मध्ये वाढ करण्याची मागणी होती.याबाबत अनेक बैठका देखील पार पडल्या होत्या.रास्त भाव दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक होते.त्यामुळे मंत्रिमंडळाने राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या अर्थात राशन दुकानदारांच्या मार्जिनच्या रकमेत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज,मंगळवार १२ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्याच्या वितरणासाठी रास्त भाव दुकानदारांना सध्या देण्यात येणाऱ्या १५०/- रुपये प्रति क्विंटल (१५०० रुपये प्रति मेट्रिक टन)या मार्जिन दरामध्ये २०/- रुपये प्रति क्विंटल (२०० रुपये प्रति मेट्रिक टन) एवढी वाढ करून त्यांना १७०/-रुपये प्रति क्विंटल (१७०० रुपये प्रति मेट्रिक टन) मार्जिन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.यामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजित वार्षिक ९२.७१ कोटी रुपये इतका अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!