Tuesday, September 8, 2026
Homeमुंबईराज्यातील निवडणूक कार्यक्रम संपला आहे; आता तरी जनतेच्या समस्यांचे निराकरण करावे…-विरोधी पक्षनेते...

राज्यातील निवडणूक कार्यक्रम संपला आहे; आता तरी जनतेच्या समस्यांचे निराकरण करावे…-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ अशी परिस्थिती आहे.त्यामुळे आता सरकारने जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे; अशी मागणी करीत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

वडेट्टीवार म्हणाले की,संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे.भीषण पाणटंचाई आहे.त्यामुळे शेतकरी असो की सामान्य जनता त्रस्त आहे.अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणी अजूनही पंचनामे करण्यात आलेले नाही.राज्य सरकारने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.वडेट्टीवार यासंदर्भात बोलताना म्हणाले की, दुष्काळी भागात चारा छावण्या,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरकारने करावी.टँकर राज्यात सुरु असेल तरी राज्यातील पाणीसाठा इतका कमी आहे की येणाऱ्या दिवसात टँकर देण्यासाठी पाणी उपलब्ध असेल का? हा प्रश्न आहे.लोकसभा निवडणुकीमुळे शासन व प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त राहिले आता राज्यातील निवडणूक कार्यक्रम संपला आहे.राज्य सरकारने तातडीने पाणी व चाऱ्याची सोय करण्याकडे लक्ष द्यावे; अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

लाईनमनला ‘एसीबी’चा जोरदार झटका..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका ३६ वर्षीय कंत्राटी लाईनमनला नागपूरच्या एसीबी पथकाने तब्बल ८ हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडुन जोरदार झटका दिला आहे.मुकेश...

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!