Thursday, September 24, 2026
Homeमुंबईराज्यभरातील भटक्या जमातीच्या बांधवांना मोठा दिलासा…-आता भटक्या जमातीतील नागरिकांना हमीपत्रावरही  मिळणार रेशनकार्ड..

राज्यभरातील भटक्या जमातीच्या बांधवांना मोठा दिलासा…-आता भटक्या जमातीतील नागरिकांना हमीपत्रावरही  मिळणार रेशनकार्ड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- भटक्या जमातीतील नागरिकांचा कुठेही ठाव ठिकाणा नसतो. कधी या गावी तर कधी त्या गावी जाऊन पोटाची खळगी भरून उदरनिर्वाह करीत असतात.त्यामुळे अनेकवेळा त्यांना कागदपत्रांची पूर्तता करता येत नव्हती.भटक्या जमातीतील नागरिकांना रेशनकार्ड मिळण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी,राज्यभरातील अनेक बांधव रेशनकार्डपासून वंचित होते.मात्र,आता या जमातीतील बांधवांना रेशनकार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, केवळ हमीपत्रावर त्यांना रेशनकार्ड मिळणार आहे.शासनाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील या बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गावा गावांत फिरून पोट भरणाऱ्या या समाजातील काही नागरिकांकडे आधारकार्ड,मतदान कार्ड किंवा जन्म दाखल्याबाबत काहीच पुरावा नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहावे लागते. शासनाद्वारे पुरविण्यात येणारे मोफत धान्यसुद्धा त्यांना मिळत नसल्याची स्थिती आहे.आता मात्र, स्वयंघोषणापत्र किंवा मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी झाल्याचे ओळखपत्र,सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी किंवा प्राधिकृत केलेल्या राजपत्रित अधिकाऱ्यांनी भटक्या विमुक्त जमातीचा नागरिक असल्याचे दिलेले प्रमाणपत्र,रहिवासी यासंदर्भात शहरी भागात नगरसेवक आणि ग्रामीण भागात सरपंच,उपसरपंच यांचे त्या भागातील रहिवासाचे प्रमाणपत्र रेशनकार्ड देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.त्यामुळे थोडाफार का होईना या समाजातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!