- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-रस्ता ओलांडत असतांना एका अज्ञात वाहनाने काळवीट प्राण्याला धडक दिल्याने यात काळवीट गंभीर जखमी होवून उपचारासाठी नेत असतांनाच मृत पावल्याची घटना भंडारा-तुमसर महामार्गावरील खरबी शेतशिवारात घडली.विशेष म्हणजे,याच परिसरात यापूर्वीही अनेक वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे महामार्ग ओलांडतांना होणाऱ्या अपघातांमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.
काल रविवारी सकाळच्या सुमारास खरबी शिवारातील जंगलातून एक काळवीट रस्ता ओलांडत असतांना तुमसरकडे जाणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.धडकेत काळविटाच्या पायाला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने ते रस्त्याच्या कडेला कोसळले.घटनेची माहिती मार्गावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाने तात्काळ वन विभागाला फोनवरून दिली.घटनेचे गांभीर्य लक्षात घेत मोहाडी पोलिस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तत्पूर्वी पोलिसांनी जखमी काळविटाची काळजी घेतली. वन विभागाचे कर्मचारी येताच पुढील उपचारासाठी त्याला पोलिस गाडीतूनच तुमसर येथे हलविण्यात आले. यावेळी वन विभागाचे कर्मचारीही उपस्थित होते. मात्र, उपचारादरम्यान काळवीटचा मृत्यू झाला.घटनेने वन्यजीव प्रेमिंकडून वन विभागाच्या कार्यप्रणालीवर रोष व्यक्त करण्यात येत आहे.प्रशासकीय उदासीनतेमुळेच वन्यप्राण्यांचा मृत्यू होत असल्याचे बोलले जात आहे.
- Advertisement -

