- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महिलांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे व समस्यांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येत आहे.समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे या हेतुने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या तिसरा सोमवार व तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.
महिलांचे कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक समस्या,गाऱ्हाणी,अडी अडचणी ऐकुण त्यांचे अर्ज स्विकारण्यात येईल.परंतु न्याय प्रविष्ठ प्रकरणे,सेवा विषयक व आस्थापना विषयक बाबी विहित नमुन्यात नसलेले किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाही.तसेच अर्ज हे वैयक्तिक स्वरुपाचे असावेत.अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली,बॅरेक क्रमांक-१,खोली क्रमांक-२६,२७ कॉम्पलेक्स, गडचिरोली या कार्यालयात नि:शुल्क प्राप्त होईल.अर्ज १५ दिवसाआधी दोन प्रतीत सादर करावे.येत्या २१ जुलै २०२५ रोजी सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा महिला लोकशाही दिनाची सभा आयोजित करण्यात आलेली असल्याने सर्व पीडित/समस्याग्रस्त महिलांनी आपले अर्ज सदर कार्यालयात सादर करावेत,असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.
- Advertisement -

