- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-ईव्हीएमचा मुद्दा,मत चोरीचा मुद्दा, मतदार याद्यांमध्ये घोळ व इतर नाना तऱ्हेचे आरोप विरोधी पक्षांकडून केले जात असतांनाच कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.कर्नाटक सरकारने राज्यातील निवडणुका मतपत्रिकांवर(बॅलेट पेपर)घेण्याची शिफारस निवडणूक आयोगाला करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार राज्यातील आगामी पंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकांवर घेण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देतांना कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के.पाटील यांनी ईव्हीएमवर लोकांचा विश्वास राहिलेला नसल्याचे कारण सांगितले होते.मतदार याद्यांमधील विसंगती आणि मत चोरीच्या आरोपांचा उल्लेख करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार यादी सुधारित आणि आवश्यक असल्यास,पुन्हा तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला अधिकार देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळाने घेतला.प्रसंगी कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी भाजपला प्रत्युत्तर देतांना म्हटले की,हा कर्नाटक सरकारचा निर्णय आहे,भाजपला काळजी का? सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ शकते.भाजपच्या कार्यकाळात बनवलेल्या कायद्यात एक तरतूद आहे.निवडणुकीत मतपत्रिका किंवा ईव्हीएम वापरले जाऊ शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतपत्रिका वापरण्याचा निर्णय घेतला आहे,तुम्ही का घाबरता? संसदीय निवडणुकांमध्ये काय घडले,याची आम्ही चौकशी केली आहे,मला आता त्यावर चर्चा करायची नाही.असेही ते म्हणाले.
- Advertisement -

