Monday, July 13, 2026
Homeभंडारामोहफुल गोळा करण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय इसमाचा वाघाने घेतला नरडीचा  घोट….

मोहफुल गोळा करण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय इसमाचा वाघाने घेतला नरडीचा  घोट….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

पवनी(भंडारा) :- मोहफुल गोळा करण्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय इसमावर वाघाने झडप घालून ठार केल्याची घटना पवनी तालुक्यातील सावरला वनविभागात काल,गुरूवारी दिनांक- ४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली.ताराचंद लक्ष्मण सावरबांधे असे मृताचे नाव आहे.या घटनेमुळे नागरिकांनी रोष व्यक्त केल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.विशेष म्हणजे मागील आठवड्यात २५ मार्च रोजी कन्हाळगाव येथील सीता श्रावण दडमल वय ६५ वर्ष ही मोहफूल वेचण्यासाठी गेलेली महिलासुद्धा वाघाच्या हल्ल्यात ठार झाली होती.सात दिवसांतील सलग दोन वेळा वाघाच्या हल्ल्यात बळीमुळे दहशत पसरली आहे.ताराचंद सावरबांधे व त्यांचे कुटुंबीय मोहफुले वेचण्यासाठी प्रादेशिक वनविभागाच्या सावरला परिसरातील कंपार्टमेंट ३१३ मध्ये काल,गुरुवारी सकाळी गेले होते.सावरल्यावरून  गावाकडे जाणाऱ्या मार्गावर मोहफूल वेचत असताना मुलगा व पत्नी दुसऱ्या झाडाकडे मोह वेचण्याकरिता गेले.दरम्यान वाघाने ताराचंदवर झडप घेत त्याच्या नरडीचा घोट घेतला.घटनेची माहिती गावात होताच गर्दी उसळली. प्रादेशिक वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांसह घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय पवनी येथे नेण्यात आले.दरम्यान जनतेचा रोष उसळल्याने तणावाची स्थिती उद्भवली होती.घटनास्थळी जिल्हा उपवनसंरक्षक राहुल गवई, सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी निलक, डीवायएसपी मनोज सिडाम, ठाणेदार निलेश ब्राह्मणे व इतर वनाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.दरम्यान वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडण्याच्या घटना वाढल्याने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!