Friday, October 16, 2026
Homeनागपूरमोठी बातमी…भाजप खासदार अशोक नेत्यांच्या चारचाकी वाहनाचा अपघात…-कारच्या एअरबॅग्ज उघडल्याने अशोक नेते...

मोठी बातमी…भाजप खासदार अशोक नेत्यांच्या चारचाकी वाहनाचा अपघात…-कारच्या एअरबॅग्ज उघडल्याने अशोक नेते बचावले थोडक्यात….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- गडचिरोलीचे भाजप खासदार अशोक नेते यांच्या चारचाकी वाहनाचा अपघात झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे.नागपूरहून गडचिरोलीच्या दिशेने जाताना वीरगावाजवळ हा अपघात झाला.सुदैवाने अशोक नेते त्यात थोडक्यात बचावले.पण त्यांच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे.अशोक नेते हे भाजपचे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाचे खासदार आहेत.ते महायुतीच्या बैठकीसाठी मुंबईला गेले होते.काल शुक्रवारी सायंकाळची बैठक आटोपल्यानंतर ते रात्री उशिरा नागपूरला दाखल झाले.त्यामुळे त्यांना नागपुरातच मुक्काम करावा लागला.त्यानंतर आज शनिवारी सकाळी ते गडचिरोली स्थित आपल्या घरी जात होते. परंतु शनिवारी आज सकाळी १० च्या सुमारास त्यांच्या फोर्ड एन्डेव्हर कारीला (MH ३३ AA ९९९०) वीरगाव लगत अपघात झाला.

खासदार अशोक नेते यांच्या कारचे नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजकाला धडकली.गाडीत अशोक नेते यांच्यासह त्यांचे पीए दिवाकर गेडाम व अन्य ४ अंगरक्षक होते.कार चालक एका ट्रकला ओव्हरटेक करताना अचानक गाडीत तांत्रिक बिघाड निर्माण झाला.यामुळे ड्रायव्हरचे नियंत्रण सुटून कार थेट दुभाजकावर जावून आदळली.या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले.सुदैवाने खासदार अशोक नेते व त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या ४ जणांना कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.सध्या अशोक नेते गडचिरोलीतील आपल्या निवासस्थानी पोहोचल्याची माहिती आहे.कारच्या एअरबॅग्ज योग्यवेळी उघडल्यामुळे अशोक नेते व त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या ४ जणांचे प्राण वाचल्याचे बोलले जात आहे.बॅग्ज उघडल्या नसत्या तर मोठी दुर्घटना घडण्याची संभावना नाकारता येणार नसल्याचे कारच्या दुर्घटना वरून दिसून येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!