Tuesday, July 21, 2026
Homeकुरखेडामोठी बातमी महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा कुरखेडा सतीनदी पात्रात आढळला मृतदेह; घातपाताचा...

मोठी बातमी महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा कुरखेडा सतीनदी पात्रात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहराच्या कुंभीटोला मार्गावरील सार्वजनिक नळ योजनेच्या विहीरीपासून काही अंतरावर असलेल्या सती नदीपात्रात एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा आज,शनिवार २५ जानेवारीला सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.रोहीत राजेंद्र तूलावी वय २० वर्षे रा.जैतपूरटोला ग्रामपंचायत गोठणगांव, ता.कुरखेडा असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार,आज शनिवार सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉकला(शारीरिक कसरत) जाणाऱ्या काही नागरिकांना सती नदी पात्रात कुणीतरी झोपलेल्या अवस्थेत दिसून आले.त्यानुसार नागरिकांनी जवळ जाऊन बघितले असता,एक मुलगा मृतावस्थेत दिसून आला.त्यानुसार नागरिकांनी याबाबत कुरखेडा पोलिसांना माहिती दिली.कुरखेडा पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेन्द्र वाघ यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला.मृतक युवक हा कुरखेडा शहराच्या मुनघाटे महाविद्यालयाच्या बि एस सी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असून त्याच्या अंगावरील बनियान,शर्ट व स्वेटर बाजूला काढून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.त्यामुळे त्याच्या घातपाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सदर घटनेचा पुढील तपास कुरखेडा पोलीस प्रशासन करीत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

कोणताही पात्र बांधकाम कामगार योजनांपासून वंचित राहू नये.. -प्रत्येक ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावर विशेष जनजागृती मोहीम राबवा- आमदार रामदास मसराम

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई अंतर्गत जिल्हा कामगार सुविधा केंद्र,गडचिरोली यांच्या वतीने आज,सोमवार २० जुलै रोजी देसाईगंज पंचायत समिती...

तब्बल ११७ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ११५ ग्रामपंचायत व दोन नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावरील एकूण ११७ आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी १५ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!