उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री वयोश्री योजनेला शासनाने मुदतवाढ दिली आहे.६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने,उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ्य केंद्र,योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी वार्षिक ३ हजार रुपये ज्येष्ठ नागरिकांना देत ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबवण्यात येत आहे.या योजनेचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत ४ ऑक्टोंबर पर्यंत होती.आता अर्ज स्वीकारण्यास ३१ ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.३१ ऑक्टोंबर पर्यंत पात्र ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज सादर करावेत; असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री वयोश्री योजनेस मुदतवाढ; ‘या’ तारखे पर्यंत भरता येणार ज्येष्ठ नागरिकांना अर्ज
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

