उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय धोरणानुसार,दोन अपत्यानंतर प्रसूतीसाठी रजा मंजूर करता येत नाही,असे सांगत मद्रास उच्च न्यायालयाने या शिक्षिका महिलेची प्रसूती रजा नाकारली होती.परंतु महिलेचे तिसरे अपत्य हे दुसऱ्या लग्नातून झालेले आहे; असे सांगत सुप्रीम कोर्टाने मद्रास उच्च न्यायालयाचा निकाल रद्दबातल ठरवला.मातृत्वाची रजा हा महिलांचा हक्क आहे.यामध्ये महिलांना जगण्याचा अधिकार,आरोग्य,प्रतिष्ठा मिळते,असेही सुप्रीम कोर्टाने नमूद केले.महिला कर्मचाऱ्यांना नोकरी करत असतांना मिळणारी प्रसूतीची रजा हा केवळ सामाजिक न्यायाचा विषय राहिला नसून तो कर्मचाऱ्यांना संविधानाने दिलेला हक्क आहे.अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणावर सुनावणी करतांना निर्वाळा दिला.मद्रास उच्च न्यायालयाने एका सरकारी शिक्षिकेला तिच्या तिसऱ्या अपत्याच्या जन्मासाठी प्रसूती रजा नाकारण्याचा आदेश क़ोर्टाने धुडकावला.न्यायाधीश अभय ओक आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा दिला.महिला कर्मचाऱ्यांप्रती सामाजिक न्यायाची भूमिका ठेवणे,त्यांची ऊर्जेची भरपाई करणे,बाळाचे पालनपोषण करणे आणि त्यानंतर पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर पुन्हा आधीसारखी कार्यक्षमतेची पातळी राखणे हा प्रसूती रजेमागील उद्देश आहे.हा केवळ मातृत्वाचा विषय नसून नवजात बाळाकडेही लक्ष देण्याची आवश्यकता असते,असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.
मातृत्वाची रजा हा महिलांचा हक्क- सर्वोच्च न्यायालय – शिक्षिका महिलेची नाकारलेली प्रसूती रजा रद्दबातल..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

