नागपूर :-माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री काटोल-जलालखेडा मार्गावरील बेलफाटाजवळ झालेल्या दगडफेकीची घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली आहे.रात्रभर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.देशमुख यांच्यावर चौघांनी हल्ला केला होता व त्यानंतर ते भारसिंगीच्या दिशेने फरार झाले.पोलिसांनी काल,मंगळवारी संबंधित घटनेचे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून ‘रिक्रिएशन’ केले.तांत्रिक माध्यमातून तपासावर भर देण्यात येत आहे; अशी माहिती नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी पत्रपरिषदेत दिली.यावेळी ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार हेदेखील उपस्थित होते.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर चार अज्ञातांनी हल्ला केल्याचे निष्पन्न…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
अनिल देशमुख यांच्या वाहनावर दगडफेक झाली तेव्हा ते समोर बसले होते.पोलिसांचे दोन सुरक्षारक्षक मागच्या वाहनात होते.घटना घडली तेव्हा वाहनाची गती कमी होती.यावेळी चारजण समोर आले.त्यांनी फेकलेला साडेसात किलो वजनाचा दगड समोरील काचेवर पडला,तर दुसरा दगड मागील दाराच्या खिडकीतून फेकून मारण्यात आला.या दगडफेकीत देशमुख जखमी झाले होते.देशमुख यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी घडलेल्या घटनेसंदर्भात काटोल पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न,बेकायदेशीरपणे रस्ता अडविणे, इतरांची सुरक्षितता धोक्यात आणणे, या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या माध्यमातून देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक कशी झाली,यांचे रिक्रिएशन करण्यात आले आहे.याच्या माध्यमातून विविध शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.तसेच परिसरातील मोबाईल टॉवरच्या माध्यमातूनदेखील परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल क्रमांकांचा डेटा एकत्रित करण्यात येत आहे.त्या परिसरात होत असलेल्या मोबाईल कॉल्सचा या माध्यमातून अभ्यास करण्यात येईल.प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या पथकानेदेखील सॅम्पल परीक्षणासाठी नेले आहेत,असे हर्ष पोद्दार यांनी स्पष्ट केले.
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

