Wednesday, September 23, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. मुदत संपणाऱ्या पाचही आमदारांचा कार्यकाळ अंतिम टप्प्यात आला आहे.यामध्ये नागपूर पदवीधर मतदार संघाचे अभिजीत गोविंदराव वंजारी(काँग्रेस),पुणे पदवीधर मतदार संघाचे अरुण गणपती लाड(राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट),औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे सतीश भानुदास चव्हाण(राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट)या तीन पदवीधर प्रतिनिधींचा समावेश आहे. तर अमरावती शिक्षक मतदार संघाचे किरण रामराव सरनाईक (शिवसेना शिंदे गट)व पुणे शिक्षक मतदार संघाचे जयंत दिनकर आसगावकर(काँग्रेस)या दोन शिक्षक प्रतिनिधींचाही कार्यकाळ संपत आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.त्यानुसार,निवडणुकीसाठी अर्ज प्रक्रिया २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.तर २३ ऑक्टोंबर रोजी मतदान व २७ ऑक्टोंबर २०२६ रोजी निकाल लागून पदवीधर आणि शिक्षकांचा कौल स्पष्ट होणार आहे.
  • शिक्षक-पदवीधर निवडणूक कार्यक्रम👇
अर्ज प्रक्रिया :- २९ सप्टेंबर २०२६ पासून सुरू.
उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख :- ६ ऑक्टोंबर २०२६
अर्जाची छाननी :- ७ ऑक्टोंबर २०२६ 
अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख :- ९ ऑक्टोंबर २०२६
मतदान दिवस :- २३ ऑक्टोंबर २०२६
मतमोजणी व निकाल :- २७ ऑक्टोंबर २०२६
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!