Friday, June 19, 2026
Homeमुंबईमहायुती सरकार आज मांडणार विश्वासदर्शक ठराव...

महायुती सरकार आज मांडणार विश्वासदर्शक ठराव…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आज सोमवारी ९ डिसेंबरला आपला विश्वासदर्शक ठराव मांडणार आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर विश्वासदर्शक ठराव सभागृहात मांडला जाणार आहे.दरम्यान,येत्या गुरुवार १२ डिसेंबरला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
२८८ सदस्यांच्या सभागृहात महायुतीकडे तब्बल २३७ आमदारांचे बहुमत आहे.त्यामुळे विश्वासदर्शक ठराव संमत होणे,ही केवळ औपचारिकता राहिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर राज्यातील फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.उदय सामंत,दिलीप वळसे पाटील,रवी राणा हे नियम २३ अन्वये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळावर विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत असल्याचा प्रस्ताव मांडतील.महायुतीकडील भरभक्कम बहुमतामुळे आवाजी मतदानाने हा प्रस्ताव संमत केला जाण्याची शक्यता अधिक आहे.दरम्यान, विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन तोंडावर असल्याने येत्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!