Friday, June 19, 2026
Homeनागपूरकिरकोळ पावसासह पुढील दोन दिवसांत थंडीची लाट..

किरकोळ पावसासह पुढील दोन दिवसांत थंडीची लाट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-फेंगल चक्रीवादळाचे सावट ओसरले असले तरी ढगाळ वातावरण नागपूर,गडचिरोली व  विदर्भातील इतर जिल्ह्यात कायम आहे.ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचीही शक्यता आहे.त्यानंतरच ढगांची गर्दी हटून थंडीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.थंडीचे हे आवर्तन पुढचे १० दिवस राहील, असा हवामान खात्याने अंदाज दर्शविला आहे.काल रविवारी नागपूरचा पारा १ अंशाने
घसरून १९.२ अंशांवर आला.हे तापमान अद्यापही सरासरीपेक्षा ६.२ अंशांनी अधिक आहे.नागपूरसह विदर्भातील तापमान घसरले आहे.अकोल्याचे किमान तापमान ३.७ अंशांनी घटून १७ अंशांवर आले. अमरावती,यवतमाळ,गडचिरोली,गोंदियाचा पारा २० अंशांच्या खाली आला.दरम्यान,भंडारा येथे काल रविवारी पावसाच्या सरी बरसल्या व ९ मि.मी. पावसाची नोंद झाली.येथील पहाटेचे तापमान २० अंशांचे होते.ब्रम्हपुरीत शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला व २५ मि.मी.ची नोंद झाली.वर्ध्याचा पाराही २०.२ अंशांवर आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र ढगांची गर्दी ओसरून थंडीचा प्रभाव पुन्हा वाढण्याची स्थिती आहे.विदर्भात मात्र थंडीचीही पुन्हा दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.येत्या २४ तासात काही ठिकाणी पाऊस होईल,अशी शक्यता आहे.नागपूरला काल रविवारी आकाश काहीअंशी ढगांनी व्यापले होते.सायंकाळी हे आच्छादन आणखी गडद झाले व पावसाची शक्यता निर्माण झाली होती.ढगांचा वेढा १० डिसेंबरपर्यंत राहण्याची व त्यानंतर पुढचे १० दिवस थंडीत पूर्वीसारखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!