Monday, May 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्यात भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण..! कारवाई अभावी आपण काहीही केले तरी आपले ...

राज्यात भ्रष्टाचाऱ्यांची पाठराखण..! कारवाई अभावी आपण काहीही केले तरी आपले वाईट होणार नसल्याची भावना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्यात एकीकडे प्रशासनातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने लाचलुचपत प्रतिबंधक खाते स्थापन केले असले तरी दुसरीकडे मात्र लाचखोरीच्या प्रकरणात शिक्षा झालेल्यांना नियमानुसार बडतर्फ करण्याबाबत आणि लाच घेतांना रंगेहाथ सापडलेल्यांना निलंबित करण्याबाबत राज्य सरकारतर्फे टाळाटाळ केली जात असल्याचे निराशाजनक चित्र आहे.
दैनिक पुढारी ने दिलेल्या वृत्तानुसार,लाचखोरांवर नियमानुसार निलंबन व बडतर्फीची कारवाई राज्य सरकारतर्फे वेळेत केली जात नसल्याने,आपण काहीही केले तरी आपले काही वाईट होणार नाही,ही भावना प्रशासनात निर्माण झाली असून यामुळे लाचखोरीला अधिकच प्रोत्साहन मिळत असल्याचे दुर्देवी चित्र आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) नोव्हेंबर महिना अखेरच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास भ्रष्टाचार व लाचखोरीच्या प्रकरणांत न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतरही राज्य सरकारतर्फे अद्याप १७ अधिकारी व कर्मचारी यांना बडतर्फ करण्यात आलेले नाही.भारतासह जगातील १४० देशांत ९ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिवस म्हणून साजरा केला जात असून देशातील भ्रष्टाचाराची पातळी चिंताजनक स्तरावर पोहोचली आहे.जगातील भ्रष्ट देशांची यादी तयार करणाऱ्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या २०२३ च्या अहवालानुसार भारत ९८ व्या क्रमांकावर आहे.
एसीबीच्या नागपूर परिक्षेत्रातील सर्वाधिक ४,तर त्याखालोखाल अमरावती,नांदेड व नाशिक परिक्षेत्रातील प्रत्येकी तीन कर्मचाऱ्यांवर अद्याप बडतर्फीची कारवाई करण्यात आलेली नाही.यापैकी काहींना ८ ते १० वर्षांपूर्वीच न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.काही प्रकरणांत न्यायालयातून स्थगिती मिळविणे,तर काही प्रकरणांत वरिष्ठांतर्फे बडतर्फी होणार नाही,यासाठी नाना तऱ्हेचे प्रयत्न करून या भ्रष्ट अधिकारी वा कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी वाचवली आहे.वाशिम येथील मृद व जलसंधारण विभागात प्रमोद प्रभाकर कळवे या कनिष्ठ अभियंत्याला तक्रारदाराच्या आईच्या नावे मंजूर झालेली विहीर खोदण्यासाठीचा धनादेश देण्याकरीता लाच मागितल्याबद्दल एप्रिल २०१८ मध्ये न्यायालयाने ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली.त्यानंतर या अधिकाऱ्याला नियमानुसार बडतर्फ करण्यासाठी लाचलुचपत विभागाने सक्षम अधिकाऱ्याला अनेक स्मरणपत्रे पाठविली,मात्र तरीही कळंबे यांना अद्याप
बडतर्फ करण्यात आलेले नाही.जळगाव जिल्ह्यातील भडगाव नगरपरिषदेच्या तत्कालीन मुख्याधिकारी स्नेहल विसपुते यांना २०१२ मध्ये एका सापळ्यात लाच घेतांना पकडण्यात आले.त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांना न्यायालयाने २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.त्यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव गेली ५ वर्षे मंत्रालयातील नगरविकास विभागात मंजुरीची प्रतीक्षा करीत आहे.वसई पंचायत समितीतील जयश्री निरगुडे कुलकर्णी या पाणीपुरवठा विभागातील शाखा अभियंता,नागपूर जिल्ह्यातील उमरेड नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंता रमेश शंभरकर,नागपूर येथील पोलिस हवालदार मोतीराम शिंदे,नांदेड जिल्ह्यातील भोकर पोलिस स्टेशनमधील पोलीस नाईक शिवराज टरके यांच्याही बडतर्फीसाठी लाचलुचपत खात्याने पाठविलेले प्रस्ताव थंडबस्त्यात पडून आहेत.
शासकीय सेवकाने सरकारी कामासाठी लाच मागितली तर नागरिक एसीबीकडे तक्रार करतात. त्यानंतर एसीबी सापळे रचून अशा अधिका-यांना पकडते, सापळे रचून रंगेहाथ पकडलेल्या व त्यानंतर जामीन न मिळालेल्या किंवा तुरूंगात असलेल्या तब्बल १७० अधिकारी-कर्मचारी यांना तात्काळ निलंबित केले जाणे अपेक्षित असतानाही त्यांना ८ ते १० वर्षे उलटूनही निलंबित केले जात नसल्याचे धक्कादायक चित्र या निमित्ताने उघडकीस आले आहे. मुंबई परिक्षेत्रातील सर्वाधिक ४३, ठाणे परिक्षेत्रातील ३८, संभाजीनगर परिक्षेत्रातील २३, पुणे परिक्षेत्रातील १६ अधिकारी कर्मचारी यांना अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही.निलंबित न करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचा-यांचे शासकीय विभागनिहाय विश्लेषण केल्यास शिक्षण व क्रीडा विभागातील ४०, मनपा व नगरपालिकांचा कारभार पाहणा-या नगरविकास-२ मधील ३७,पोलीस,कारागृह व होमगार्डमधील २४ अधिकारी-कर्मचारी यांचा समावेश आहे.विशेष म्हणजे लाचखोरी करतांना पकडण्यात आलेल्यांच्या यादीत मोठ्या प्रमाणावर मुख्याध्यापक, शिक्षक,सहाय्यक शिक्षक यांचा समावेश आहे.
लाचखोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी अधिकारी-कर्मचारी यांच्यावर खटले चालविण्यासाठी एसीबीला हे अधिकारी-कर्मचारी कार्यरत असलेल्या विभागातील सक्षम अधिकाऱ्याची अनुमती लागते.तसेच खटला चालवितांना कनिष्ठ पातळीवरील न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात आव्हान याचिका दाखल करायलाही अनुमतीची गरज असते.सक्षम अधिकाऱ्यांच्या अशा अनुमतींसाठी ४३१ प्रकरणे नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रलंबित आहेत. यात सर्वाधिक पोलीस विभागातील ८३,महसूल विभागातील ६१ आणि ग्रामविकास विभागातील ५९ प्रकरणांचा समावेश आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

परीक्षेत अपयश; विद्यार्थ्याने गळफास घेऊन संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील रोंघा गावातील एका तरुणाने बारावी बोर्डाच्या परीक्षेत अपयश आल्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना काल शनिवारी परीक्षेचा निकाल...

उकाड्यापासून मिळणार दिलासा; मेघगर्जनेसह पाऊस,विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त :-उकाड्याने नागरिक हैराण झालेले असतांनाच हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत पुढील काही दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने आता या कडक उन्हातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!