Saturday, June 27, 2026
Homeदेसाईगंजमहात्मा गांधी नगर परिषद शाळेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली..

महात्मा गांधी नगर परिषद शाळेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज,६ डिसेंबरला देसाईगंजच्या नैनपूर येथील महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत पूजन केले.प्रसंगी विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांचे विचार,कर्तृत्व व सामाजिक योगदान यांचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उमाकांत कवासे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नारायण तिघरे उपस्थित होते.कार्यक्रमास प्रमुख  मार्गदर्शक म्हणून सहाय्यक कृषी अधिकारी कल्पना ठाकरे उपस्थित होत्या.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक खेमराज तिघरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” हा बाबासाहेबांचा विचार विद्यार्थ्यांसमोर मांडत शिक्षणाचे परिवर्तनशील सामर्थ्य स्पष्ट केले.कल्पना ठाकरे यांनी मृदा संवर्धनाचे महत्त्व सांगत बाबासाहेबांच्या राष्ट्रनिर्माणातील योगदानाची आठवण करून दिली.तर उमाकांत कवासे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात महापरिनिर्वाण कां म्हटले जाते याबाबतचे विचार विद्यार्थ्यांपुढे मांडले.कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थिनी हृंचिका कांबळे हिने केले,तर आभार प्रदर्शन सक्षम कवासे यांनी व्यक्त केले.प्रसंगी शाळेचे शिक्षकवृंद ईश्वर गहाणे,मंगेश तुपट,त्रिशाली सुखदेवे, अपर्णा जाडे,प्रियंका तलमले व शिक्षिका प्राची यांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमाद्वारे बाबासाहेबांच्या कार्याचा जागर करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!