नागपूर :-हल्ली सर्वत्र महागाईचा बोलबाला सुरू झाला आहे.डाळी,तांदूळ आणि लाल मिरच्यांसोबतच खाद्यतेलाच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. अश्यातच सत्ताधारी यांचेसह विरोधकही डोळेझाक करीत आहेत.त्याचबरोबर,सर्वसामान्य जनतेलाही ‘ना सुतक ना वारसा’ असल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे,केवळ एका आठवड्यात तेलाच्या किंमती २० ते ३० रुपये प्रति किलो आणि तेलाच्या डब्याच्या किंमती २५० ते ३०० रुपयांनी वाढल्या आहेत.यामुळे इतर वस्तूंप्रमाणेच स्वयंपाकघरातील बजेट बिघडले आहे. सोयाबीन,तांदूळ,सूर्यफूल आणि फल्ली तेलाच्या किंमती चढ्या दराने आहेत.सोयाबीनच्या किंमती २० रुपये प्रति किलोने तर फल्ली तेलाच्या किंमती ३० ते ३५ रुपयांनी वाढल्या आहेत.फल्लीसोबत सरसोचे तेल हे सर्वांत महाग तेल आहे.फल्ली तेल सध्या प्रति किलो १८८ आहे तर सरसो तेल सध्या प्रति किलो १९० आहे.शिवाय, सोयाबीन तेल,जे प्रति किलो १३८ ते १४० होते.ते आता प्रति किलो १५८ वर पोहोचले आहे.१५ किलोच्या टिनाच्या डब्याची किंमत २ हजार ३५० ते २ हजार ३८० पर्यंत पोहोचली आहे.फल्ली तेलाच्या टिनाच्या डब्याची किंमत २ हजार ६५० ते २ हजार ६८० वर पोहोचली आहे.जी एका आठवड्यापूर्वी प्रति किलो २ हजार ३०० रुपये होती.एका आठवड्यात सर्व प्रकारच्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत.परदेशातील किंमती वाढल्यामुळे आणि रुपया घसरल्याने आयात अधिक महाग झाली आहे.लग्नाच्या हंगामात तेलाची मागणी लक्षणीयरीत्या वाढली.ही मागणी पाहता तेलाच्या किंमती कमी होण्याची शक्यता कमी आहे.
महागाईवर डोळेझाक; खाद्य तेलाच्या किंमतीचा भडका उडाल्याने बजेट बिघडले..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

