Friday, September 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमहागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

महागाईची झळ; दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीसह दूध विक्रीत होणार वाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-अगोदरच महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेले असतांनाच आता त्यात आणखी भर पडून दूध उत्पादक आणि प्रक्रिया व्यावसायिकांनी दूध विक्रीच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.केवळ दूधच नव्हे,तर दही,ताक, पनीर,तूप यांसारख्या विविध दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीतही तब्बल दहा टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. नवे दर हे येत्या,मंगळवार ११ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार आहेत.विशेष म्हणजे,डिझेलच्या दरात लिटरमागे दहा रुपये,साखरेच्या दरात किलोमागे बारा रुपये आणि पॅकिंग साहित्यात तीस टक्क्यांहून अधिक वाढ झाल्याने दूध व्यावसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. सदरचा वाढता उत्पादन खर्च भागवण्यासाठी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी दरवाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्यातील सहकारी आणि खासगी डेअऱ्यांची शिखर संस्था असलेल्या दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघाने घेतला आहे.त्यानुसार,गायीचे दूध ६० रुपयांवरून ६२ रुपये,म्हशीचे दूध ७६ रुपयांवरून ७८ रुपये,तर
दुग्धजन्य पदार्थ दहा टक्क्यांपर्यंत महागणार आहेत. सदरच्या निर्णयामुळे दररोज दूध खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबांच्या मासिक बजेटवर मोठा ताण येणार आहे.यासह,दुग्धजन्य पदार्थांचे भाव वाढल्यास हॉटेल व्यवसाय,मिठाईची दुकाने आणि बेकरी उद्योगांवरही याचा थेट परिणाम दिसून येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!