- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-सध्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.तत्पूर्वी तसेच अधिवेशन काळात विविध विभागांच्या बैठकांचा आणि नियोजनाचा धडाका सुरू आहे.या दरम्यान,राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची विभागाशी निगडित धोरणे व धोरणात्मक निर्णय आणि महत्वाच्या मुद्द्यांना अनुसरून एक महत्त्वाची बैठक बोलावली होती.मंत्र्यांचे स्पष्ट आदेश असतांनाही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव तथा २०११ च्या बॅचचे आयएएस(IAS) अधिकारी एम.देवेंद्र सिंग बैठकीला अनुपस्थित राहिले.मंत्र्यांच्या बैठकीला दांडी मारणे आणि शासकीय कामात कसूर केल्याप्रकरणी आज,शुक्रवार २७ फेब्रुवारीला एम.देवेंद्र सिंग यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.या प्रकरणाची विधानसभेत दखल घेण्यात आली असून तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचे निर्देश दिले होते.त्यानुसार,सामान्य प्रशासन विभागाने एम. देवेंद्र सिंग यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करत त्यांना तात्काळ निलंबित केले आहे.सनदी अधिकारी म्हणजेच आयएएस अधिकाऱ्याने
मंत्र्यांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झालेल्या या थेट कारवाईमुळे सध्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.महाराष्ट्र शासनाने ‘अखिल भारतीय सेवा(शिस्त व अपील) नियम,१९६९’ मधील नियम ३ च्या उपनियम (१) च्या कलम (अ) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करत,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव एम.देवेंद्र सिंग (IAS,२०११ बॅच) यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.या निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय मुंबई येथे निश्चित करण्यात आले असून,कोकण विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही,असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
- Advertisement -

