उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आज,मंगळवारी दुपारच्या सुमारास ब्रम्हपुरीच्या कमलाई निवास येथे विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन कुरखेडा तालुक्याच्या अरततोंडी येथील निवासी मोहन लोहंबरे यांनी भारतीय राष्ट्रीय काँगेस पक्षाचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश केला.
मोहन लोहंबरे हे सामाजिक कार्यकर्ते असून ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे यांचे सहकारी मित्र आहेत.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तसेच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून राजकारणा सोबतच समाजकारणात स्वतः ला झोकून पक्षवाढीची कामे,गोर गरीब,सर्वसामान्य जनतेची कामे करण्याच्या हेतूने पक्ष प्रवेश केला असल्याचे लोहंबरे यांनी सांगितले.पुढील वाटचालीस विजय वडेट्टीवार,ओबीसी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस मनोज ढोरे,युवक काँग्रेस प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार व उपस्थित मान्यवरांनी मोहन लोहंबरे यांना शुभेछा दिल्या.

