Tuesday, July 21, 2026
Homeब्रम्हपुरीब्रम्हपुरी तालुक्याचे चित्रपट दिग्दर्शक आशिष नागदेवते यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान...

ब्रम्हपुरी तालुक्याचे चित्रपट दिग्दर्शक आशिष नागदेवते यांना दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
ब्रम्हपुरी(चंद्रपूर):-जिद्द आणि चिकाटी असली की यश हे नक्कीच प्राप्त होत असते.याचेच उदाहरण मुळचे ब्रम्हपुरी तालुक्यातील उदापूर येथील रहिवासी असलेले विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेचे कर्मचारी तसेच संत कबीर फिल्म प्रोडक्शन्स नागपूरचे चित्रपट दिग्दर्शक तथा लेखक आशिष अशोक नागदेवते यांना चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत,अभिनेत्री सिमा कुलकर्णी,अभिनेता मिहीर जैस्वाल व रंजित कावळे यांच्या हस्ते नुकतेच मुंबई येथे बेस्ट लघु चित्रपट दिग्दर्शक म्हणून दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले आहे.आशिष नागदेवते यांच्या ‘भिकारी’ या लघु चित्रपटाला बेस्ट दिग्दर्शक तर अभिनेते सुरेंद्र मेश्राम यांना बेस्ट एक्टर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
आशिष नागदेवते दिग्दर्शित भिकारी हा चित्रपट समाजातील वास्तवीक प्रश्नांवर आधारित असून तो समाजाला प्रेरणादायी ठरणारा आहे.चित्रपटाचे गीत मुळचे ब्रम्हपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील सुप्रसिद्ध लेखक व कवी रोशनकुमार पिल्लेवान यांनी लिहिलेले असून त्याद्वारे समाजाची वास्तविकता दर्शविली आहे.आशिष नागदेवते यांचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्राथमिक शाळा,उदापूर येथून झाले असून त्यांचे पुढील शिक्षण नेवजाबाई हितकारीणी हायस्कूल व महाविद्यालय ब्रम्हपुरी येथून झाले.तर पोस्ट ग्रॅज्युएशन नागपूर विद्यापीठ कॅम्पस येथे झाले. तसेच अमरावती विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयामध्ये त्यांची पी.एच.डी सुरू आहे.शिक्षणासोबत त्यांना लिखाण व चित्रपट क्षेत्रात सुद्धा आवड असल्याने त्यांनी नौकरी व सर्व गोष्टींमध्ये समतोल साधला आहे. याचेच फलित म्हणून त्यांना बेस्ट दिग्दर्शक म्हणून दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्यांच्या या यशाबद्दल विदर्भ कोंकण ग्रामीण बॅंकेचे कर्मचारी,चित्रपट दिग्दर्शक नागेश वाहुरवाघ,अभिनेते सुरेंद्र मेश्राम,लेखक रोशनकुमार पिल्लेवान तसेच संत कबीर फिल्म प्रोडक्शनचे सदस्य, नातेवाईक व मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्रामपंचायतींच्या जन सुविधा निधीत मोठी वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील ग्रामीण भागाचा विकास करतो म्हटले तर निधीचा अभाव,त्यातच निधीची कमतरता यामुळे स्थानिक पातळीवरील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करणे अशक्य होते.यासाठी ग्रामीण...

शेतकऱ्यांना हलक्यात घेऊन त्यांच्याशी राजकीय डावपेच खेळाल तर पेचात पडाल- आमदार रोहित पवार

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत शेतकरी कर्जमाफी बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.सरकारकडून नुसत्या तारखा देण्यात येत असल्याने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र...

इंडिया स्किल्स स्पर्धेसाठी नोंदणी सुरू; राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य सिद्ध करण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित 'इंडिया स्किल्स'(IndiaSkills) आणि 'वर्ल्ड स्किल्स'(WorldSkills) स्पर्धांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून,त्या-त्या जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी या...

मन सुन्न करणारी घटना..! जन्मदातीने दहा महिन्यांच्या चिमुकलीचा जीव घेतला अन् मृतदेह खांद्यावर घेऊन पोहचली ठाण्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-सोलापूर जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना आज सोमवारी सर्वत्र उघडकीस आली. एका २६ वर्षीय जनमदात्या आईने स्वतःच्या दहा महिन्याच्या पोटच्या लेकीला संपवून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!