Thursday, August 27, 2026
Homeगोंदियाबोनससाठी शेती नसलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी...

बोनससाठी शेती नसलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-गोरेगाव तालुक्यातील तीन केंद्रांवर ग्रेडर आणि केंद्रप्रमुखांनी दीड कोटी रुपयांच्या धानाची अफरातफर केल्याचा प्रकार उघडकीस आला.आता याच तालुक्यातील काही शासकीय केंद्राच्या माध्यमातून शेती नसलेल्या शेतकऱ्यांची नावे बोनस मिळावा,यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.त्यामुळे याप्रकरणी पुन्हा काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
गेल्यावर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यातील महायुती सरकारने धानाला हेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर केला.यानंतर यासंबंधीचा जीआर निघाला.बोनसचा लाभ हा शासनाच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मिळेल हे शासनाने आधीच स्पष्ट केले.यासाठी जिल्ह्यातील १ लाख ५६ हजार शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली तर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी ७६ हजार शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली. अर्ध्या शेतकऱ्यांनी केवळ बोनससाठी नोंदणी केल्याचे पुढे आले आहे.विशेष म्हणजे शासनाने यावर्षी नोंदणीसाठी पोर्टलमध्ये बदल केला.सुरुवातीला ऑनलाइन नोंदणी एमईएनएल या पोर्टलवर केली जात होती.तर यावर्षीपासून ती भीम पोर्टलवर केली जात आहे.सुरुवातीला या पोर्टलमध्ये अनेक अडचणी आल्याने काही दिवस मॅन्युअल नोंदणी करण्यात आली.याचाच फायदा घेत काही शासकीय धान खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांच्या नावाची नोंदणी केली.ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेती नाही, अशा शेतकऱ्यांची सुद्धा भीम पोर्टलवर नोंदणी केली असल्याचे पुढे आले आहे.याची तक्रार सुद्धा संबंधित विभागाकडे करण्यात आली आहे..
गोरेगाव तालुक्यातील काही केंद्रावर हा प्रकार पुढे आल्यानंतर याची जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे तक्रार करण्यात आली.यानंतर विभागाने सुद्धा याची गांभीर्याने दखल घेतली असून पोर्टलवर नोंदणी केलेल्या नावाची पडताळणी केली जाणार असून त्यातील बोगस नोंदणी केलेली नावे वगळण्यात येणार आहेत.तसेच बोगस नोंदणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!