गोंदिया :-नागपूरच्या महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या((डीआरआय)प्रादेशिक पथकाने गोंदिया जिल्ह्यातील वन्यजीव तस्करांच्या मुसक्या आवळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याची कातडी बाळगल्याप्रकरणी पथकाने दोघांना ताब्यात घेतले.धनराज रामलाल उईके वय ३५ वर्षे, रा.ढिवरीनटोला,ता.देवरी,जि.गोंदिया व नीलकंठ रामचंद्र पंधरे वय ३७ वर्षे,राश्रीरामनगर,ता.सडक अर्जुनी, जि.गोंदिया अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.नागपूर डीआरआय पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे काल मंगळवारी देवरी-पुराडा मार्गावरील मोहनटोला परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली.त्यांच्याकडून पांढऱ्या कापडात गुंडाळून ठेवलेली बिबट्याची कातडी आणि इतर संबंधित साहित्य जप्त करून पंचासमक्ष पंचनामा करण्यात आला.दरम्यान,डीआरआयच्या पथकाने प्राथमिक कागदपत्रे व पंचनामा पूर्ण करून जप्त कातडीसह दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी देवरी वनविभागाच्या स्वाधीन केले.विशेष म्हणजे,बिबट्या हा वन्यजीव संरक्षण अधिनियम,१९७२ अंतर्गत संरक्षित वन्यप्राणी असून त्याची कातडी बाळगणे,खरेदी-विक्री करणे वा अवैध व्यापार करणे कायद्याने बंदी आहे. अश्यातच दोघांनी बिबट्याची कातडी बाळगल्याने बिबट्याची कातडी नेमकी कुठून आणली?ती कोणाकडून मिळाली आणि तिचा व्यवहार कोणासोबत होणार होता? या तस्करीत आणखी काही मोठ्या रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याने या सर्व प्रश्नांचा शोध घेणे गरजेचे आहे.
बिबट्याच्या कातडीसह दोघेजण ताब्यात..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक

