Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीबिचाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या 'लव्हस्टोरी' प्रकरणी हात धुवून मागे लागले गावकरी..!

बिचाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या ‘लव्हस्टोरी’ प्रकरणी हात धुवून मागे लागले गावकरी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्याच्या जयनगर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत प्रभारी मुख्याध्यापक आणि विज्ञान शाखेच्या शिक्षिकेची ‘लव्ह स्टोरी’ चांगलीच रंगल्याने शाळा व्यवस्थापन समितीने शिक्षण विभागाकडे तक्रार केली.तक्रारीनंतर चौकशी करून मुख्याध्यापक व शिक्षिकेची वेगवेगळ्या शाळेत तात्पुरती बदली करण्यात आली.हे प्रेमीयुगूल शिक्षक दूर झाले असले तरी ते एकाच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या सेवा देत आहेत.पालकांच्या तक्रारीची दखल घेत व प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या झळकताच शिक्षण विभागाने समितीमार्फत प्रकरणाची चौकशी केली. मात्र,समितीने तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशीचा अहवाल अजूनही उघड केला नाही. तक्रारीमुळे दोघांनाही पंचायत समितीस्तरावरून चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली व कुनघाडा माल येथे बदली करण्यात आली आहे.मुख्याध्यापकास विकासपल्ली तर विज्ञान शाखेच्या शिक्षिकेला कुनघाडा माल शाळेत तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली आहे.यावर पालकांचे समाधान न झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती तसेच ग्रामस्थांच्या वतीने काल,मंगळवार २५ मार्च रोजी शाळेला कुलूप ठोकून शाळेसमोर धरणे आंदोलन केले.दोन्ही शिक्षकांना जोपर्यंत निलंबित करण्यात येत नाही,तोपर्यंत शाळेचे कुलूप काढण्यात येणार नाही, असा पावित्रा ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे.सदरच्या आंदोलनामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ माजली असून बिचाऱ्या मुख्याध्यापक आणि शिक्षिकेच्या लव्हस्टोरी प्रकरणी गावकरी हात धुवून मागे लागले असल्याचे बोलले जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर सावधान..!

उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक...

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!