Wednesday, June 10, 2026
Homeनागपूरबर्ड फ्लू विषाणूने घेतला तीन वाघ आणि एका बिबट्याचा बळी; देशातील पहिलीच...

बर्ड फ्लू विषाणूने घेतला तीन वाघ आणि एका बिबट्याचा बळी; देशातील पहिलीच घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपुरात बर्ड फ्लूमुळे तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली असून व्याघ्र प्रकल्प आणि बचाव केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याची माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरचे संचालक शतानिक भागवत यांनी दिली.वाघ आणि बिबट्यामध्ये उलट्या, डोळ्यात पाणी येणे,छातीत इन्फेक्शन आणि ताप अशी लक्षणे दिसून आल्याचे सांगितले.
महाराष्ट्रातील नागपूर येथील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू एच-५एन-१ विषाणूमुळे झाल्याचा अहवाल भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानने दिला आहे.डिसेंबरमध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवले होते.प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या चाचणीचा अहवाल १ जानेवारी २०२५ रोजी समोर आला होता.या नंतर रेस्क्यू सेंटरमधील २६ बिबट्या आणि १२ वाघांची तपासणी केली असता ते निरोगी आढळले.तीनही वाघ तीन ते चार वर्षाचे होते. तर बिबट्या ७ ते ८ महिन्यांचा होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुर्गम गडचिरोलीतील तब्बल ७८ विद्यार्थ्यांना देशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात आलेला ‘मिशन-२००’ हा उपक्रम...

अखेर नदीत बुडालेल्या तीन तरुणांचे सापडले मृतदेह; उर्वरित दोन युवकांचा शोध सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या घुग्गुस शहरातील पाच तरुण म्हातारदेवी परिसरातील वर्धा नदीवर पोहण्यासाठी गेले असता काल सोमवारच्या रात्री उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने नदीत बुडाल्याची भीती...

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना झटका.. आता नऊ सिलेंडरवर नाही; तर चारच सिलेंडरवर मिळणार अनुदान..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात रविवार ७ जून २०२६ पासून २९ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार, बऱ्याचश्या जिल्ह्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतींनी...

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी आधार पडताळणी करणे आवश्यक..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील अनेक शेतकरी गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती,अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ आणि शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,यामुळे आर्थिक संकटाचा सामना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!