Saturday, May 2, 2026
Homeनागपूरप्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट; पतीच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल...

प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट; पतीच्या जाचाला कंटाळून टोकाचे पाऊल…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-‘प्रेम हे प्रेम असते’ प्रेमात कुठलीही सीमा नसते.एकदा प्रेमात पडले की सारे रान मोकळे असते. अशातच एकदा का प्रेमात दुरावा निर्माण झाला की त्याचा शेवट भयावह असते.अशीच प्रचिती एका प्रेमी जोडप्या बाबत घडल्याचे उघडकीस आले आहे.सुरुवातीला सुत जुळले आणि पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने टोकाचे पाऊल उचलले व प्रेमविवाहाचा दुर्दैवी शेवट झाल्याची घटना लकडगंज पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.अश्विनी बादुले वय २३ वर्षे,गरोबा मैदान,कापसी चौक,जुना बगडगंज, नागपूर असे मृत विवाहितेचे नाव आहे.७ जून २०२४ रोजी तिचा भावेशकुमार प्रेमचंद बादुले वय ३२ वर्षे याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता.सुखाचा संसार होईल,अशी तिची स्वप्ने असतांना भावेशकुमारने मात्र लग्नानंतर काही दिवसांतच रंग दाखविण्यास सुरुवात केली.तो लहानसहान गोष्टींवरून वाद घालायचा.तिला शिवीगाळ करत मारहाण करायचा.त्याने तिला माहेरच्यांशी बोलण्यासदेखील मनाई केली होती.मागील काही दिवसांपासून त्याचा छळ वाढला होता.त्याने अनेकदा अश्विनीला मारहाण केली होती.यामुळे ती प्रचंड तणावात होती.लग्न झाल्यापासून अश्विनीला भावेशकुमार याने शारीरिक व मानसिक त्रास देत तिला मारहाण करून क्रूर वागणूक दिली.त्यानेच तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप तिच्या आई मालती कुकटे वय ५२ वर्षे,जयदुर्गानगर, पारडी यांनी केला.आरोपीला अटक करण्यात आली आहे.२४ जानेवारी रोजी सकाळी पावणेअकरा वाजेच्या सुमारास अश्विनीने घरच्यांना व्हिडीओ कॉल केला.त्यावेळी ती रडत होती.त्यानंतर तिने त्यांना मेसेजेस पाठविले.त्यात पतीच्या छळाबाबत सांगितले. रात्री ११ वाजेच्या सुमारास तिने सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.अश्विनी व तिचा पती दोघेही उच्चशिक्षित आहेत.नोकरीच्या निमित्तानेच त्यांची मैत्री झाली होती. भावेशला तिच्या माहेरच्यांचा राग यायचा व त्यातूनच तो अश्विनीला आई-वडिलासह भावाशी बोलण्यास मनाई करीत होता.लग्न झाल्यानंतर भावेशने अश्विनीला नोकरी सोडण्यास सांगितले.भावेशच्या आईकडून अश्विनीला नेहमी टोमणे मारण्यात यायचे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस भरतीत पात्र ठरलेले युवक-युवतीचा कुरखेडा मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत कुरखेडा शहराच्या मुस्लिम समाजातील एक युवक व एक युवती पात्र ठरले आहे.प्रथमच शहरातील मुस्लिम समाजाची युवक-युवती पोलीस दलात दाखल...

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!