Wednesday, April 15, 2026
Homeमुंबईप्रसिद्ध गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड..

प्रसिद्ध गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी आज, रविवार १२ एप्रिल रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.ज्येष्ठ गायिका आणि पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित आशा भोसले यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना काल शनिवारच्या संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.त्यांना छातीचा संसर्ग व हृदयविकाराशी संबंधित त्रास जाणवत असल्याने तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असतांनाच आज दुपारच्या सुमारास त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.याबाबत आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी जाहीर केले. उद्या सोमवारच्या सकाळी ११ ते २ या वेळेत त्या लोअर परळ या ठिकाणी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत,असे आनंद भोसले यांनी स्पष्ट केले.
आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे झाला.आशा भोसले यांनी वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या संस्कारातून संगीताचे धडे घेतले.सुरुवातीच्या संघर्षानंतर त्यांनी हिंदी,मराठी, बंगाली,गुजराती,तमिळ, तेलुगू अशा तब्बल वीस पेक्षा अधिक भाषांमध्ये बारा हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड करून विक्रम प्रस्थापित केला. “पिया तू अब तो आजा”, “दम मारो दम”, “चुरा लिया है तुमने”, “ये मेरा दिल” यांसारखी गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!