- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-देसाईगंज तहसीलदार पदावर एका महिन्यासाठी परिविक्षाधीन अधिकारी असणारे सिद्धार्थ शुक्ला यांची नुकतीच २ जुलै २०२५ च्या शासनाच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली होती.मात्र,आता राज्य सरकारने प्रशासनात मोठे फेरबदल करीत राज्यातील २० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.यात सिद्धार्थ शुक्ला यांना अमरावतीच्या प्रकल्प अधिकारी म्हणून ITDP, धारणी आणि धारणी उपविभागात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- बदली करण्यात आलेले अधिकारी👇
१.एम.एम.सूर्यवंशी (आयएएस:एससीएस: २०१०) यांची व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,मुंबई येथून वसई-विरार महानगरपालिका वसई येथे महानगरपालिका आयुक्त पदावर नियुक्ती.
२.दीपा मुधोळ-मुंडे (आयएएस:आरआर: २०११) यांची अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक,पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड,पुणे येथून पुण्यात समाज कल्याण आयुक्त पदावर नियुक्ती.
३.नीलेश गटणे (आयएएस:एससीएस: २०१२) यांची मुख्य कार्यकारी अधिकारी,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,पुणे येथून व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ मुंबई येथे नियुक्ती.
४.ज्ञानेश्वर खिलारी (आयएएस:एससीएस:२०१३) यांची संचालक,ओबीसी,बहुजन कल्याण,पुणे येथून अतिरिक्त सेटलमेंट आयुक्त आणि अतिरिक्त संचालक, भूमी अभिलेख,पुणे येथे नियुक्ती.
५.अनिलकुमार पवार (आयएएस:एससीएस:२०१४) यांची महानगरपालिका आयुक्त,वसई-विरार महानगरपालिका,वसई येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, MMRSRA ठाणे येथे नियुक्ती.
६.सतीशकुमार खडके (आयएएस:एससीएस:2014)यांना संचालक (आपत्ती व्यवस्थापन),महसूल आणि वन विभाग, मंत्रालय मुंबई येथून मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,पुणे येथे नियुक्ती.
७.भालचंद्र चव्हाण (आयएएस: नॉन एससीएस:२०१९)यांची आयुक्त,भू-सर्वेक्षण विकास संस्था,पुणे येथून संचालक(आपत्ती व्यवस्थापन), महसूल आणि वन विभाग,मंत्रालय,मुंबई येथे नियुक्ती.
८.सिद्धार्थ शुक्ला (आयएएस:आरआर:२०२३) यांच्या दिनांक २.०७.२०२५ च्या आदेशात बदल करुन सहाय्यक जिल्हाधिकारी,गोडपिंपरी उपविभाग, चंद्रपूर यांना प्रकल्प अधिकारी म्हणून ITDP, धारणी आणि सहाय्यक जिल्हाधिकारी,धारणी उपविभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
९.विजयसिंह शंकरराव देशमुख(अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर पदोन्नती)यांची अतिरिक्त आयुक्त-२,छत्रपती संभाजीनगर विभाग येथून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती.
१०.विजय सहदेवराव भाकरे(अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती)यांची अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती,भंडारा येथून सदस्य सचिव,विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर म्हणून नियुक्ती.
११.त्रिगुण शामराव कुलकर्णी (अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर पदोन्नती) यांची अतिरिक्त महासंचालक,MEDA,पुणे येथून यशदा,पुणे येथे उपमहासंचालक पदावर नियुक्ती.
१२.गजानन धोंडीराम पाटील(अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती)यांची मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,पुणे येथून मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,पुणे या पदावर नियुक्ती.
१३.पंकज संतोष देवरे(अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस)यांची अध्यक्ष,जिल्हा जात वैधता समिती, लातूर येथून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड,पुणे येथे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती.
१४.महेश भास्करराव पाटील(अतिरिक्त जिल्हाधिकारी आयएएस म्हणून पदोन्नती) यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त (महसूल) पुणे विभाग येथून आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था,पुणे आयुक्त पदावर नियुक्ती.
१५.मंजिरी मधुसूदन मानोलकर(अतिरिक्त जिल्हाधिकारी,IAS म्हणून पदोन्नती)यांची सहआयुक्त, (पुनर्वसन),नाशिक विभाग,नाशिक येथून व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ,पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
१६.आशा अफझल खान पठाण(अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती) यांची सहसचिव,मुख्यमंत्री सचिवालय,नागपूर येथून सहसचिव,मुख्यमंत्री सचिवालय,नागपूर या पदावर नियुक्ती.
१७.राजलक्ष्मी सफिक शाह(अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS वर पदोन्नती)यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त(जनरल),कोकण विभाग,मुंबई येथून व्यवस्थापकीय संचालक,MAVIM,मुंबई म्हणून नियुक्ती.
१८.सोनाली नीलकंठच मुळे(अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती)यांची अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती,अमरावती येथून संचालक, OBC,बहुजन कल्याण,पुणे या पदावर नियुक्ती.
१९.गजेंद्र चिमंतराव बावणे(अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती)यांची अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती,बुलढाणा येथून आयुक्त,भू- सर्वेक्षण विकास संस्था,पुणे या पदावर नियुक्ती.
२०.प्रतिभा समाधान इंगळे(अतिरिक्त जिल्हाधिकारी IAS पदावर पदोन्नती)यांची अध्यक्ष, जिल्हा जात वैधता समिती,सांगली येथून आयुक्त, अल्पसंख्याक विकास,छत्रपती संभाजीनगर या पदावर नियुक्ती.
- Advertisement -

