- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-चंद्रपुरात एम.डी.(MEPHEDRONE)ड्रग्ज पावडर विक्रीसाठी आणले जात असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून एका आरोपीसह ५२८ ग्रॅम एम.डी ड्रग्ज पावडर(प्रति ग्रॅम दर ५ हजार रुपये)एकूण किंमत २६ लाख ४० हजार,मोबाईल फोन,रोकड,आणि कार असा एकूण ३५ लाख ७ हजार ४८० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.प्रकरणी वसीम इमदाद खान वय ३७ वर्षे रा.बैगनवाडी,साईबाबा मंदिराजवळ, गोवंडी,मुंबई यास अटक करून गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन पडोली, चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसीम खान हा एम.डी.ड्रग्ज पावडर विक्रीसाठी चंद्रपूरकडे येत असल्याची माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे पथकास मिळाली होती.त्यानुसार नागपूर-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावरील साखरवाही फाटा, एच.पी.पेट्रोल पंपासमोर सापळा रचण्यात आला.काही वेळातच आरोपी त्याच्या एमएच-१० ईक्यू-०४२१ क्रमांकाच्या कारने सापळा रचलेल्या घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी झाडाझडती घेत कारवाई केली.
- Advertisement -

