Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच.. - २६ लाख ३४...

पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता लवकरच.. – २६ लाख ३४ हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी लाभदायक जरी ठरली असली तरी या योजनेसाठी मोठी रक्कम लागत असल्याने सरकारच्या दमछाक होऊ लागले आहे.अश्यातच शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. महिला व बाल विकास विभागाने आज,बुधवार ३० जुलै रोजी शासन निर्णय जारी करत लाडकी बहीण योजनेच्या जुलै हप्त्यासाठी तब्बल २ हजार ९८४ कोटींचा निधी वितरित केला असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत पात्र लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता खात्यात जमा होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती.यानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाने सुमारे २६ लाख ३४ हजार लाभार्थी अपात्र असतांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे.यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे,तर काही कुटुंबामध्ये २ पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे, तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आली आहे.या माहितीच्या आधारे जून २०२५ पासून या २६ लाख ३४ हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे २.२५ कोटी पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून २०२५ महिन्याचा सन्माननिधी वितरित करण्यात आला आहे.तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या २६ लाख ३४ हजार लाभार्थ्यांच्या माहितीशी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभशासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल,असेही मंत्री तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!