Wednesday, September 2, 2026
Homeनागपूरपहिली पत्नी असूनही दुसरी सोबत प्रेमसंबंध; नातेवाईकांनी धो-धो धुतले..!

पहिली पत्नी असूनही दुसरी सोबत प्रेमसंबंध; नातेवाईकांनी धो-धो धुतले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-प्रेमाची सीमाच नाही,”प्रेमात आणि युद्धात सर्वकाही” अशी म्हण आहे.पण,सदरची म्हण सर्वच ठिकाणी लागू होणार,असे मुळीच नाही.अश्याच प्रकारे पहिली पत्नी नावडती झाल्याने दुसरीचा मोह करणाऱ्या पतीला नातेवाईकांनी समजुतीसाठी बोलावले अन् जो धो-धो धुतला की,यात पती आणि प्रेमिकाचा हात फॅक्चर होई पर्यंत सोडलेच नाही. सदरची घटना ही नागपूरच्या बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घोगली चौकात घडली.५५ वर्षीय राजेंद्र असे पतीचे नाव आहे,तर अपर्णा असे प्रेमिकेचे नाव आहे.राजेंद्रची वडिलोपार्जित जमीन आहे.पहिली पत्नी असतांना त्याचे अर्पणा नावाच्या महिलेसोबत प्रेमसंबंध आहेत.तो बहुतांश वेळ अर्पणासोबत घालवितो.त्यामुळे त्याची पहिली पत्नी आणि तिचे नातेवाईक संतप्त झाले होते.११ ऑगस्टला पहिल्या पत्नीच्या नातेवाइकांनी राजेंद्रला चर्चा करण्यासाठी बेलतरोडीच्या घोगली चौकात बोलविले.राजेंद्र अर्पणासोबत तेथे पोहोचला.तेथे पहिल्या पत्नीचे नातेवाईक असलेले दोन पुरुष व दोन महिला उपस्थित होत्या.त्यांनी अर्पणा सोबत का राहतो,अशी विचारणा करून राजेंद्र आणि अर्पणा यांना लाकडी दांड्याने चांगलेच धुतले.यात अर्पणाचा हात फॅक्चर झाला.दोघांनाही उपचारासाठी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले.राजेंद्रने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पहिली पत्नी आणि तिच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!