Thursday, August 27, 2026
Homeदेसाईगंजपरिश्रम,प्रामाणिकपणा आणि चिकाटी हेच उद्योगातील यशाचे सूत्र….. नगर परिषद देसाईगंजचे माजी उपाध्यक्ष मुरलीधर सुंदरकर...

परिश्रम,प्रामाणिकपणा आणि चिकाटी हेच उद्योगातील यशाचे सूत्र….. नगर परिषद देसाईगंजचे माजी उपाध्यक्ष मुरलीधर सुंदरकर यांचे प्रतिपादन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर केवळ नोकरीच्या मागे न लागता स्वतः उद्योग स्थापनेच्या दृष्टीने प्रयत्न करावे; जे परिश्रम, प्रामाणिकपणा आणि चिकाटीने प्रयत्न करातात ते निश्चितच उद्योगात एक मोठी भरारी घेतात.हेच उद्योगातील यशाचे सूत्र आहे.असे प्रतिपादन नगर परिषद देसाईगंजचे माजी उपाध्यक्ष व शहारातील एक प्रसिद्ध व यशस्वी लघु उद्द्योजक मुरलीधर सुंदरकर यांनी विद्यार्थ्यांना संबंधित करतांना म्हटले आहे.ते आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा विभागाद्वारे आयोजित ‘उद्यमिता दिवस’ कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्थानावरून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील  गुणवत्ता हमी कक्षाचे प्रभारी डॉ.श्रीराम गहाणे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. निहार  बोदेले प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. 

पुढे बोलतांना ते म्हणाले की,”विद्यार्थ्यांच्या उपक्रमशीलतेवरच विद्यार्थ्यांची,देशाची आत्मनिर्भरता आणि विकास अवलंबून आहे.विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतांना ओळखून उपक्रमशीलतेकडे वळले पाहिजे. समस्या हे प्रत्येकाच्या जीवनात असतात.त्या समस्यांना न घाबरता जिद्दीने आणि परिश्रमाने उद्योग विकासाचा ध्यास घ्यावा.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.श्रीराम गहाणे; अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले की,”मनुष्याला त्याचे विचार मोठे बनवतात.जसे विचार मनुष्याचे असतात तो तसाच घडत जातो.जर विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक बनण्याची तीव्र इच्छा असेल तर त्या अनुषंगाने त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच माहिती गोळा करणे, उद्योग स्थापना बाबतच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती जाणून घ्यावी,स्थानिक संसाधनाचा उपयोग करून काय करता येईल याबाबत संशोधक वृत्तीने शोध घ्यावा व स्वयंरोजगारकडे वळावे जेणेकरून विद्यार्थी भविष्यात रोजगार मागणारे नव्हे तर रोजगार देणारे बनवू शकतात.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोजगार मार्गदर्शन व स्पर्धा  परीक्षा विभाग प्रमुख प्रा.निहार बोदेले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.अमोल बोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार चंदन शिवघरे  विद्यार्थ्यानी मानले.कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!