Tuesday, September 1, 2026
Homeनागपूरपक्षाचे कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी की,लावणीच्या कार्यक्रमांसाठी? - अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस...

पक्षाचे कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी की,लावणीच्या कार्यक्रमांसाठी? – अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील प्रकार; व्हिडिओ व्हायरल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- “पक्षाचे कार्यालय जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी की,लावणीच्या कार्यक्रमांसाठी?”असे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूरच्या गणेशपेठ येथील कार्यालयात दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमातील लावणी सादरीकरणाचा  व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नव्या वादाची ठिणगी पेटू लागली आहे.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपुरातील मुख्य कार्यालय गणेशपेठ परिसरात असून काल,रविवार २६ ऑक्टोंबरला कार्यालयात राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नृत्यांचाही कार्यक्रम पार पडला.प्रसिद्ध नृत्यांगना शिल्पा शाहीर यांनी “मला जाऊ द्या घरी घरी आता वाजले की बारा..” या गाण्यावर नृत्य सादर केले. लागलीच पक्षाच्या कार्यालयात अशा प्रकारे लावणीचे सादरीकरण झाल्याने राजकीय प्रतिक्रिया उमटून सदरचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊन टीकेची तोफ डागली जात आहे.एकीकडे शेतकऱ्यांची प्रश्र्ने,महागाई,बेरोजगारी व इतर समस्यांनी ग्रासले असतांना अश्या प्रकारचे कृत्य अशोभनीय असून विरोधी पक्षांकडून टीकास्त्र डागले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.विशेष म्हणजे,पक्षाचे कार्यालय जनतेची कामे करण्यासाठी असतात.

  • व्हायरल व्हिडिओ👇
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!