Sunday, September 6, 2026
Homeमुंबईनिवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुकीनंतर सावत्र झाली का? - २ हजार १००...

निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुकीनंतर सावत्र झाली का? – २ हजार १०० रुपये देण्याविषयी घुमजाव; लाडक्या बहिणींना दीडच हजार मिळणार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा सरकार आल्यास महिलांना २१०० रुपये देऊ असे महायुतीने म्हटले होते.मात्र निवडणूक पार पडल्यानंतर महिलांच्या खात्यात २१०० रुपये जमा झाले नाही.उलट निकषाचे कारण देऊन महिलांना योजनेतून कमी केले जात आहे.मात्र काही महिला संजय गांधी निराधार आणि लाडकी बहीण या दोन्ही योजनेचा लाभ घेत आहेत.याचा अर्थ या महिलांकडून सरकारची फसवणूक केली जात आहे.अशा महिलांवर सरकार कारवाई करणार आहे का? असा प्रश्न शिवसेना (ठाकरे)आमदार अनिल परब लक्षवेधीद्वारे उपस्थित केला.तर निवडणुकीपूर्वी लाडकी असलेली बहीण निवडणुकीनंतर सावत्र झाली का,असा प्रश्न काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला.सरकारची तिजोरी ज्यांनी रिकामी केली,त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा,अशी मागणी शशिकांत शिंदे यांनी केली.
या योजनेतून २ कोटी ६३ लाख महिलांचे अर्ज प्राप्त झाले.सप्टेंबरमध्ये जेव्हा अर्ज भरले गेले तेव्हा २ लाख ५४ हजार महिलांची संजय गांधी निराधार योजनेची आकडेवारी प्राप्त झाली.त्यामुळे त्या-त्या पद्धतीने कारवाई आम्ही करत आहोत,असे मंत्री तटकरे म्हणाल्या.त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत येत्या अर्थसंकल्पात महिलांना २ हजार १०० रुपये देऊ,अशी घोषणाच केली नव्हती,असे वक्तव्य महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधान परिषदेत केल्याने या अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींचे मानधन वाढणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.विरोधकांनी या संदर्भातील लक्षवेधी मांडत सरकारच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करीत धारेवर धरले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या अर्थसंकल्पात २ हजार १०० रुपये देण्याची घोषणा करू,असे वक्तव्य केलेले नव्हते.योजना जाहीर झाली असली तरी निवडणुकीतील जाहीरनामा हा पाच वर्षांचा असतो.त्यामुळे २ हजार १०० रुपयांसाठी योग्य तो प्रस्ताव मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री उपस्थित असतांना मंत्रिमंडळासमोर आमचा विभाग ठेवेल आणि त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल,असे मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.त्यामुळे सध्यातरी लाडक्या बहिणींना दीडच हजार मिळणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!