- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-मध्य रेल्वेच्या पुणे विभागात दौंड-मनमाड मार्गावरील अकोलनेर-अहिल्यानगर-निंबळक स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी प्री-नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगची कामे करण्यात येणार आहेत.यासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून,त्यामुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.तर काही गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.यानुसार १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस उद्या,शुक्रवार १५ मे,१६ मे आणि १७ मे रोजी नागपूरहून रद्द राहील.तसेच १२११३ पुणे-नागपूर गरीबरथ एक्स्प्रेस १६ मे,१७ मे आणि १८ मे रोजी पुण्याहून रद्द करण्यात आली आहे.याशिवाय, १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेस विशेष १६ मे रोजी नागपूरहून,तर १२१३५ पुणे-नागपूर एक्स्प्रेस १७ मे रोजी पुण्याहून रद्द राहणार आहे. दरम्यान,१७ मे रोजी २२८४५ पुणे-हटिया एक्स्प्रेस ही बदललेल्या मार्गाने लोणावळा, कर्जत,पनवेल,कल्याण, इगतपुरी,नाशिक रोड आणि मनमाड मार्गे हटियाकडे जाईल.तसेच २२१४० अजनी-पुणे एक्स्प्रेस ही मनमाड,नाशिक रोड,कल्याण, पनवेल, कर्जत आणि लोणावळा मार्गे पुण्याला पोहोचेल. याचप्रमाणे १२२२१ पुणे-हावडा दुरांतो एक्स्प्रेस १८ मे रोजी पुण्याहून अर्धा तास उशिराने सुटणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
- Advertisement -

