उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :- नागपूर जिल्ह्यात काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवू लागले आहेत.तज्ञांच्या मते,कुठल्याही प्रकारचा संभाव्य धोका नसल्याचे यापूर्वी म्हटले आहे.अशातच आज नागपूर जिल्हा चौथ्यांदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे.आज दुपारी ४ च्या सुमारास कामठी परिसरात २.४ तीव्रतेचे धक्के नोंदवले गेले आहेत.हे धक्के भूगर्भात पाच किलोमीटर खोल नोंदवले गेले आहेत.यापूर्वी पारशवनी उमरेड परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते.गेल्या काही दिवसांपासून सतत भूकपाचे धक्क जाणवत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

