Friday, May 1, 2026
Homeगोंदियामोठी बातमी; तहसीलदारासह नायब तहसीलदार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसिबी)जाळ्यात 

मोठी बातमी; तहसीलदारासह नायब तहसीलदार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसिबी)जाळ्यात 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- जिल्ह्यातील महसुल विभागात खळबळजनक घटना घडली आहे.गोरेगावचे तहसीलदार किसन के. भदाणे यांच्यासह नायब तहसिलदार नागपुरे आणि एका व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच प्रकरणात ताब्यात घेतले आहे. या तिघांच्या विरोधात गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.या प्रकरणाची कारवाई गोरेगाव तहसिल कार्यालयात करण्यात आली. या नंतर या सर्व आरोपींना पुढील तपास कारवाईसाठी गोंदिया येथील कार्यालयात आणण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार,गोरेगाव तालुक्यातील वाळू वाहतूक प्रकरणी गोरेगाव तालुक्यातील गिधाडी या गावातील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार तहसीलदार किसन भदाने यांनी नायब तहसीलदार नागपुरे यांच्याद्वारे एक लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार आहे.यात गोरेगावचे तहसीलदार किसन के.भदाणे,नायब तहसिलदार नागपुरे आणि गणवीर नावाच्या एका व्यक्तीचा समावेश आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!