Friday, August 28, 2026
Homeनागपूरनागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

नागपुरात वाहनांच्या चोऱ्या करायचे अन् लाखनीत विकायचे; तिघांना बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज 
नागपूर :-भंडारा जिल्ह्याच्या लाखनी परिसरात कार्यरत असलेल्या सराईत वाहन चोरांच्या टोळीचा नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईमुळे शहरातील अनेक वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.विशेष म्हणजे,दुचाकी वाहन चोरटे नागपूर तसेच जिल्ह्याच्या परिसरातून दुचाकी वाहनांची चोरी करायचे आणि लाखनी व इतर परिसरात विकायचे.नागपुरातून वाहन चोरी करून लाखनी परिसरात नेली जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार,२३ वर्षीय पीयूष रवींद्र जगनाडे रा. बाबुलखेडा हा वाहन चोरीतील मुख्य आरोपी त्याच्या मूळ गावी लाखनी येथे लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष पथक तयार केले व मध्यरात्रीच भंडाऱ्याकडे रवाना केले. पोलिसांनी परिसरात सावधगिरीने रेकी आणि पाळत ठेवली.अनेक तासांच्या शोधानंतर पीयूष जगनाडे याला नंबर प्लेट नसलेल्या वाहनावरून फिरतांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला धुलाई देण्यात आली.धुलाईत त्याने साथीदार अंशुल सरजारे वय २३ वर्षे,रा.लाखनी, जि.भंडारा आणि दीप रामटेके वय २० वर्षे,रा.लाखनी, जि.भंडारा यांची नावे उघड केली.त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत तपास सुरू केला.तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १४ चोरीची वाहने जप्त केली. यात ३ रॉयल एनफिल्ड बुलेटचाही समावेश आहे. आरोपींकडून २ मोबाईलही ताब्यात घेतले.जप्त केलेली वाहने नागपूरच्या बजाजनगर,एमआयडीसी, प्रतापनगर,हुडकेश्वर,सोनेगाव,खापरखेडा आणि बोरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाहन चोरीच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे.आरोपींचे आंतरराज्यीय वाहन चोरी रॅकेटशी संबंध आहेत कां? याचाही तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. सदरची  कारवाई नागपूर गुन्हे शाखा युनिट-एकचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भेडोदकर व पथकाने केली. तसेच पोलिस हवालदार मनोज टेकाम आणि पथकाने महत्त्वाची गुप्त माहिती मिळवून कारवाई यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!