Monday, May 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदेसाईगंजचे पवन दत्ता गेले; तर भंडाऱ्यात नवीन जिल्हाधिकारी आले..!

देसाईगंजचे पवन दत्ता गेले; तर भंडाऱ्यात नवीन जिल्हाधिकारी आले..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-राज्य शासनाने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत गडचिरोली जिल्ह्याला ३ जुलै २०२५ रोजी तीन नवीन आयएएस अधिकारी दिले होते.त्यांची नियुक्ती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारीपदी करण्यात आली आहे.यात पूर्वी नांदेडच्या सहाय्यक जिल्हाधिकारी अनौष्का शर्मा यांची कुरखेडा उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर जालनाचे सहाय्यक जिल्हाधिकारी अरुण एम.यांची चामोर्शीच्या उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात करण्यात आली आहे.त्यातच पूर्वी नंदूरबारचे सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.जी.व्ही.एस.पवन दत्ता यांची देसाईगंजच्या उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली होती.नियुक्ती पासून बरेच दिवस ते देसाईगंज कार्यालयात रुजू झाले नव्हते. अश्यातच रुजू झाले आणि जेमतेम बोटावर मोजण्याइतकेच दिवस राहून परत पुन्हा आज, मंगळवार १२ ऑगस्ट रोजी त्यांची नाशिकच्या इगतपुरी उपविभागात नियुक्ती करण्यात आली आहे.तर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या👇
  • डॉ.अशोक करंजकर (IAS:SCS:२००९) यांची उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ,मुंबईचे सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • संजय कोलते (IAS:SCS:२०१०)जिल्हाधिकारी, भंडारा यांची शिवशाही पुनर्वसन प्रकल्प,मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • सुशील खोडवेकर (IAS:RR:२०११)सदस्य सचिव,उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ, मुंबई यांना विकास आयुक्त(असंघटित कामगार), मुंबई म्हणून नियुक्त्ती करण्यात आली आहे.
  •  सावन कुमार (IAS:RR:२०१९)मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,नंदुरबार यांची जिल्हाधिकारी,भंडारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • नमन गोयल (IAS:RR:२०२२) प्रकल्प अधिकारी, ITDP,भामरागड आणि सहाय्यक जिल्हाधिकारी,एटापल्ली उपविभाग, गडचिरोली यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद,नंदुरबार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • डॉ.जी.व्ही.एस.पवन दत्ता (IAS:RR:२०२३) सहाय्यक जिल्हाधिकारी,देसाईगंज उपविभाग, गडचिरोली यांची सहायक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • लघिमा तिवारी (IAS:RR:२०२३)सहाय्यक जिल्हाधिकारी,बल्लारपूर उपविभाग,चंद्रपूर यांची सहाय्यक जिल्हाधिकारी,गोंडपिंपरी उपविभाग,चंद्रपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

रोजगार हमी योजनेच्या कायद्याची जागा घेणाऱ्या ‘व्हीबी-जी राम जी’ योजनेत १२५ दिवस काम देण्याची हमी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच कालावधीपासून सुरू असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-२००५ कायद्याची जागा आता 'विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजिविका...

सामान्य माणसाचा जीव २५ लाखांचा ठरवत असाल तर तुम्ही स्वतः वाघासमोर उभे राहा; आम्हीही तुम्हाला २५ लाख देतो..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात वाघाच्या हल्ल्यात चार महिलांचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या पार्श्वभूमीवर सामाजिक...

वाढदिवसाचा कार्यक्रम असल्याचा बनाव; बालविवाहात सरकारी पाहुण्यांची एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह २० वर्षीय तरुणासोबत लावल्या जात असल्याची माहिती नागपूर जिल्हा बालसंरक्षण कक्षाला प्राप्त होताच पथकाने अल्पवयीन मुलीची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!