Wednesday, August 26, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज शहरातील कोट्यवधी रुपयांचा स्विमिंग पूल बंद स्वरूपात; नगर परिषद प्रशासन निद्रावस्थेत..

देसाईगंज शहरातील कोट्यवधी रुपयांचा स्विमिंग पूल बंद स्वरूपात; नगर परिषद प्रशासन निद्रावस्थेत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-शहरातील कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेला अत्याधुनिक स्विमिंग पूल गेल्या अनेक वर्षांपासून बंद स्वरूपात असून धूळखात पडला आहे.उन्हाळ्याच्या तीव्र उष्णतेत सुरक्षित जलतरण सुविधा उपलब्ध नसल्याने तरुण जीव धोक्यात घालून वैनगंगा नदी पात्राकडे स्विमिंगसाठी (पोहणे) धाव घेत असल्याने नगर परिषद प्रशासन चुप्पी साधून निद्रावस्थेत गेले की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे जीवितास धोका👇
देसाईगंजमध्ये सुरक्षित जलतरण सुविधा उपलब्ध असतांनाही ती नागरिकांना वापरता येत नाही,हे प्रशासनाच्या बेफिकिरीचे उत्तम उदाहरण आहे. स्विमिंग पूल बंद असल्यामुळे शेकडो तरुणांना दररोज खोल नदीत पोहण्याचा धोका पत्करावा लागत आहे.त्यामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ लागला आहे.
स्विमिंग पूल तातडीने सुरू करा-काँग्रेसचे युवा नेते पिंकूभाऊ बावणे👇
शहरातील तरुणांच्या सुरक्षिततेचा विचार करून काँग्रेस युवा नेते पिंकूभाऊ बावणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रशासनाला धारेवर धरित स्विमिंग पूल त्वरित सुरू करण्याची मागणी केली आहे.प्रशासनाने तातडीने निर्णय घेतला नाही,तर याबाबत तीव्र आंदोलन छेडले जाईल,असा इशारा त्यांनी दिला आहे.
प्रशासनाने वेळकाढूपणा केला,तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्हा हिवताप कार्यालयातील आरोग्य सेवक व वरिष्ठ लिपिकाने नक्षल प्रोत्साहन भत्त्याचे एरियस बिल काढण्यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी गोंदियाच्या लाच लुचपत प्रतिबंधक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!