- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज (गडचिरोली):- ५ जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.यंदाचे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त UNEP यांच्याकडून “जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत” अशी थीम घोषित करण्यात आलेली आहे.त्या अनुषंगाने जागतिक स्तरावर सुरु असलेल्या प्लास्टिक प्रदूषण निर्मुलन मोहेमे अंतर्गत देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टीक बंदी मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत अंदाजे ४० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त व ईतर सिंगल युज प्लास्टिक जप्त करण्यात करून १५,५०० रुपये इतकी दंडात्मक कार्यवाही करून वसूल करण्यात आली.
यापूर्वी रस्त्यावरील विक्रेते,फुल विक्रेते,भाजीपाला मंडी,दुकाने,बाजारपेठ,शॉपिंग माल,हॉटेल्स व्यवसाईकांना एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले होते.परंतू पाहिजे त्या प्रमाणात आळा न बसल्याने सदरची कारवाई करण्यात आली.यावेळी नगर परिषदेने केलेल्या कारवाईत प्लास्टिक आढळल्यास प्रथमत: ५ हजार रुपयाचा दंड,दुसऱ्यांदा आढळून आल्यास दहा हजार दंड आणि तिसऱ्यांदा आढळून आल्यास पंचवीस हजार रुपये दंड आणी तीन महिन्यांची शिक्षेची तरतुत असल्याची माहिती यावेळी व्यावसायिकांना देण्यात आली.
-
डॉ.कुलभुषण रामटेके,मुख्याधिकारी नगर परिषद देसाईगंज👇
- Advertisement -- Advertisement -- Advertisement -
जागतिक पर्यावरण दिनाच्या नमित्ताने शहरात प्लास्टीक बंदीची कारवाई सुरु आहे.देसाईगंज शहरासाठी नागरीकांनी आपले योगदान द्यावे.तसेच व्यवसायीकांनी प्लास्टीक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचा वापर करावा.
- Advertisement -

