Friday, May 1, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २७ प्रकरणांचा निपटारा....- आपसी तडजोड प्रकरणी ३ लाखांच्या...

देसाईगंज राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये २७ प्रकरणांचा निपटारा….- आपसी तडजोड प्रकरणी ३ लाखांच्या वर वसुली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

देसाईगंज :- तालुका विधी सेवा समिती देसाईगंज अंतर्गत खटला पूर्व प्रकरणे नियमित दिवाणी व फौजदारी प्रकरणांत वादी व प्रतिवादी यांच्यातील वाद समोपचाराने व सलोख्याने मिटविण्यासाठी आज ३० एप्रिल २०२३ रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय  देसाईगंज येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये एकुण २७ प्रकरणांचा निपटारा करण्यात आला असून सदर संपूर्ण प्रकरणांमध्ये रक्कम रुपये ३०३३२७.४७ रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

सदर राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये खटलापुर्व ८ नियमित फौजदारी व दिवाणी खटला प्रकरणांमध्ये १९ मामले असे एकुण २७ प्रकरणे मिटवून यात एकुण ३०३३२७.४७/- रुपये वसूल करण्यात आले आहे.राष्ट्रीय लोक अदालतीला पॅनल प्रमुख म्हणून  सी.पी.रघुवंशी दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्र.श्रे.गडचिरोली पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता मंगेश शेंडे हे होते.

तसेच ॲड.संजय गुरु,ॲड.मंगेश शेंडे,ॲड बी.एम. बांबोळकर,ॲड.लाँगमार्च खोब्रागडे,ॲड.दत्ता पिलारे, ॲड.प्रमोद बुध्दे व अन्य सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन यशस्वी करण्यासाठी देसाईगंज न्यायालयातील वित्त आस्थापना विभागाचे सहाय्यक अधिक्षक ए.एल.आमटे,लघुलेखक व्ही.एस.महल्ले, वरिष्ठ लिपीक चेतन भुर्रे,कनिष्ट लिपीक प्रविण माटे, कनिष्ठ लिपीक नरेंद्र लोंढे,कनिष्ठ लिपीक श्रीमती एस. यु.गावंडे,कनिष्ठ लिपीक अजय  कागदेलवार,कनिष्ठ लिपीक आर.आर.परसा,शिपाई पी.के.चालुरकर, शिपाई पुष्पा दासरवार,कारकुन प्रविण मेश्राम आदींनी अथक परिश्रम घेतले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!