Wednesday, September 30, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी; उबाठा शिवसेनेचे निवेदन..

देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी; उबाठा शिवसेनेचे निवेदन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या
देसाईगंज तालुक्यात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने तसेच वातावरणातील बदलामुळे धान पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्यांनी औषधांची फवारणी करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नाही.त्यातच,अलीकडे झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर देसाईगंज तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी,या प्रमुख मागणीसह आज,बुधवार ३० सप्टेंबर रोजी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने देसाईगंज उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसिलदार विलास तुपट यांच्या मार्फतिने प्रशासनास निवेदन सादर करण्यात आले.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी बांधव मेटाकुटीला आला आहे.नैसर्गिक आपत्तीचा सर्वात जास्त फटका हा शेतकरी बांधवांनाच बसतांना दिसून येतो आहे.दरवर्षी कोणती ना कोणती नैसर्गिक आपत्ती ओढवून उत्पादनात घट होऊन आर्थिक संकटांचा सामना शेतकरी बांधवांना करावा लागतो आहे.अश्यातच सरकार शेतकऱ्यांप्रति संवेदनशील नसल्याची भावना शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केली.विशेषतः मागील वर्षी जाहीर झालेला धानाचा बोनस अद्यापही शेतकरी बांधवांना देण्यात आलेला नसल्याने शासनाने तातडीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावा.संजय गांधी निराधार योजनेचे थकीत मानधन लाभार्थ्यांच्या खात्यात लवकर जमा करावे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी.
शेतीपूरक कर्जाची सक्तीची वसुली करू नये.शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्यासाठी शेतीपूरक व्यवसायांना जास्तीत जास्त प्राधान्य द्यावे.शेतकरी व शेतमजुरांच्या अडचणींचा सर्वंकष विचार करून शासनाने या मागण्या तातडीने मान्य कराव्यात,अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे.मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन सादर करतेवेळी जिल्हा सह संपर्क प्रमुख डॉ.श्रीकांत बनसोड,देसाईगंज तालुकाप्रमुख विलास ठाकरे, दिगांबर मेश्राम माजी जिल्हा परिषद सदस्य, गणेश ढवळे माजी सभापती,प्रल्हाद राऊत माजी पंचायत समिती सदस्य,संपत कावळे,विजय दडमल सरपंच पोटगाव,प्रशांत मैंद,शामराव गुरुणुले,जयराम झुरे,भास्कर ठाकरे,संजय हजारे,देवकुमार मानकर, माणिक धनबाते,अनिल नवघडे,यादव पारधी,राहुल घोडेस्वार,अमरदास पिलारे,धनंजय लांजेवार,अजय मोहूर्ले यांचेसह तालुक्यातील शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; परीक्षा शुल्क माफ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.दुष्काळग्रस्त भागातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ...

उद्यापासून बस प्रवासासाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून सवलतीचा प्रवास करण्यासाठी महामंडळाने 'एनसीएमसी' कार्ड अनिवार्य केले आहे.प्रवाशांना नानाविध सुविधा उपलब्ध करवून देण्यासाठी राज्य मार्ग...

अवैध रेतीची वाहतूक; दोन हायवा ट्रक जप्त..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या जुनोना परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर पोलिसांनी धडक कारवाई केली.या कारवाईत हायवा चालक सुमित संतोष टेंभूर्णे वय...

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!