Friday, October 2, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला वनस्पती व जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव..

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला वनस्पती व जैवविविधतेचा प्रत्यक्ष अनुभव..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘फील्ड प्रोजेक्ट’ अंतर्गत एक दिवसीय फील्ड विजिटचे आयोजन करण्यात आले.या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी चंद्रपूर येथील श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बॉटॅनिकल गार्डन,विसापूर येथे भेट देऊन विविध वनस्पती,जैवविविधता तसेच पर्यावरणाचा प्रत्यक्ष अभ्यास केला.या शैक्षणिक भेटीचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा.योगेश तुपट यांच्या नेतृत्वात करण्यात आले.विद्यार्थ्यांनी बॉटॅनिकल गार्डनमधील विविध वनस्पतींचे निरीक्षण करून त्यांची वैशिष्ट्ये, प्रकार,त्याचे पर्यावरणातील महत्त्व तसेच जैवविविधतेशी असलेला संबंध यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.यावेळी विज्ञान विभागातील प्रा.ज्ञानेश मोहुर्ले,प्रा.दीपक तुपटे, प्रा.मनीषा कार,प्रा. शिफाना शेख,प्रा.दिपिका शर्मा, प्रा.रोशनी पारधी आदि प्राध्यापकांनी सहकार्य केले.या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना वर्गातील सैद्धांतिक ज्ञानासोबतच प्रत्यक्ष निरीक्षण व अनुभवातून वनस्पती आणि पर्यावरणाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे सदर शैक्षणिक सहल विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षणाचा उपयुक्त उपक्रम ठरली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकास पाच वर्षाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कुकामेटा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी ४३ वर्षीय शिक्षक...

श्रमदान,सत्कार अन् संदेशपर नाटक; नैनपूरच्या शाळेत गांधी-शास्त्री जयंती उत्साहात साजरी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज शुक्रवारी महात्मा गांधी नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर येथे पालक सभा,श्रमदान,सत्कार व विविध...

कारवाईच्या भीतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस शिपाई पसार.. -प्रकरण मिटविण्यासाठी दहा हजाराची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-गुन्ह्यात तडजोड करून प्रकरण मिटवून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी भंडारा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक व पोलिस शिपाई यांच्याविरुद्ध...

गडचिरोली जिल्ह्यात ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी निर्बंध; डीजे व अतितीव्र ध्वनी उपकरणांच्या वापरास बंदी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सण,उत्सव,मिरवणुका तसेच धार्मिक, सांस्कृतिक व सार्वजनिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी उपकरणांच्या वापरावर निर्बंध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!