Friday, September 4, 2026
Homeनागपूरदारू पिऊन दररोज किटकिट लावणाऱ्या वडिलाचा टॉवलने गळा आवळून खून..

दारू पिऊन दररोज किटकिट लावणाऱ्या वडिलाचा टॉवलने गळा आवळून खून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :-दारू पिऊन दररोज आई आणि अल्पवयीन मुलासोबत किटकिट लावणाऱ्या वडिलाचा पोटच्या पोराने टॉवलने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना काल,रविवारी १९ जानेवारीच्या रात्री दहा वाजताच्या सुमारास हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंगोलेनगरात उघडकीस आली. मुकेश शंकरराव शेंडे वय ५७ वर्षे,रा.इंगोलेनगर असे खून करण्यात आलेल्या वडिलाचे नाव आहे. माहितीनुसार,मुलगा दहाव्या वर्गात शिकतो तर आई उर्मीला धुनीभांडीची कामे करतात.काल रविवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मुकेश घरी दारू पिऊन आला.त्यांनी नेहमीप्रमाणे पत्नी उर्मिला आणि मुलाला शिविगाळ करण्यास सुरुवात केली.याशिवाय दोघांनाही मारहाण केली.त्यानंतर मुकेश पुन्हा दारू पिण्यासाठी घरातून निघून गेला.रात्री दहा वाजताच्या सुमारास मुकेश घरी पुन्हा परत आला.यावेळी उर्मिला आणि त्यांचा मुलगा हे जेवण करीत होते.मुकेशने पुन्हा त्यांना शिविगाळ करण्यास सुरुवात केली.त्यामुळे मुलाने चिडून त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी मुलाने त्यांना बेडवर ढकलले आणि टॉवेलने त्याचा गळा आवळला. मुकेश यांच्या नाकातून रक्त येऊ लागले.त्यामुळे त्याने त्याला सोडून दिले.मात्र, यातच मुकेशचा मृत्यू झाला.मुकेश बेडवर निपचित पडल्याने उर्मिला यांनी त्यांच्याजवळ जाऊन त्याला हलविले.मात्र,त्याची हालचाल होत नसल्याचे बघून मुकेश मरण पावल्याचे त्यांना कळाले.यावेळी झालेली घटना लपविण्यासाठी मुलाने त्याचा मृतदेह आईच्या मदतीने प्लास्टीकच्या बोरीत भरला.यावेळी फरशीवर सांडलेले त्याचे रक्त फिनाईल टाकून पुसून घेतले. शिवाय रक्ताने माखलेले कपडे आणि चादर काढून घेत,ती ब्लँकेटमध्ये गुंडाळून बॉथरुममध्ये ठेवली. यानंतर मित्राच्या मदतीने वडिलाचा मृतदेह तो फेकूण देणार होता.दरम्यान,मुलाने वडिलांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मित्राकडे गेला असता,त्याने त्याला हुडकेश्वर पोलिसांकडे घेऊन गेला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन उर्मिला यांना ताब्यात घेतले.याशिवाय मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकलमध्ये पाठविला.याप्रकरणी मुकेश यांचे चुलत भाऊ मंगेश वामनराव शेंडे वय ५१ वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेत,दोघांनाही अटक करण्यात आली आहे.प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!