- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-एका अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील देऊटोला-बबई कालव्या जवळील शेतशिवारात सोमवार १० फेब्रुवारीला सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
देऊटोला-बबई येथील काही नागरिक सकाळच्या सुमारास शेतबांधावर गेले असता शेत परिसरात काहीतरी जळत असल्याचे दिसून आले.त्यामुळे जवळ जाऊन बघितले असता एका अज्ञात महिलेच्या अंगावर तणस व त्यावर चादर टाकून पेटविण्यात आल्याचे दिसून आल्याने घटनेची माहीती गोरेगाव पोलिस प्रशासनास देताच घटनास्थळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळाची पाहणी करून अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला होता.त्यातच जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे घटनास्थळी दाखल झाले होते.अज्ञात महिलेचा चेहरा व वरील भाग पूर्णपणे जळालेला होता.तिला जाळून मारण्याचा प्रयत्न कां व कुणी केला,हे पुढील तपासाअंती कळणार असल्याचे गोरेगाव पोलिसांनी स्पष्ट केले होते.त्यानुसार आता सदर घटनेबाबत मोठी माहिती समोर आली आहे.३८ वर्षीय तरुणाचे १८ वर्षीय तरुणीवर वीट भट्टीवर काम करीत असतांना प्रेम- प्रकरण सुरू झाले.प्रेम-प्रकरण बहरून आल्याने तरुणी गर्भवती राहिली.गर्भवती राहिल्याने लग्न करून सुखी संसाराची स्वप्ने रंगवू लागली.त्यामुळे तरुणीने तरुणाकडे लग्नाचा तगादा लावला.लग्नाचा तगादा लावताच तरुणाने तिच्यापासून कायमची सुटका व्हावी,यासाठी त्याने तरूणीचा गळा आवळून खून केला त्यानंतर तिची ओळख पटू नये,यासाठी तिच्या अंगावर चादर व तनस टाकून जाळले असल्याची कबुली आरोपी तरुणाने पोलिसांपुढे दिली.
पौर्णिमा विनोद नागवंशी वय १८ वर्षे,रा.मानेकसा असे मृत तरूणीचे नाव आहे.तर आरोपी शकील मुस्तफा सिद्दीकी वय ३८ वर्षे,रा.मामा चौक,गोविंदपुर रोड,गोंदिया याने तिचा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी कलम १०३, (१),२३८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
- Advertisement -

